Agripedia

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा संदर्भातील हवी ती सर्व माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात

Updated on 08 June, 2022 9:36 PM IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांदा संदर्भातील हवी ती सर्व माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच कांदा बियाणे पासून तर कांदा रोप तयार करणे कांदा लागवड कांद्याचे संगोपन तसेच कांदा विक्री व सर्वच बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव याची खरीती माहिती मिळत असते याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या फेसबुक ग्रुपमध्ये जवळपास दीड लाख तर

व्हाट्सअपवर 650 पेक्षा जास्त ग्रुप मधून लाखो कांदा उत्पादकांना वरील माहिती पोहोचविण्याचे काम केले जात आहे.कांद्याच्या संदर्भातील हवी ती सर्व माहिती कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपल्याजवळ असणे हे नक्कीच गरजेचे आणि फायद्याचे आहे परंतु आज अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केट मधील कांदा गोणी घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हाट्सअपbआणि फेसबुकवर फिरत आहे.

आणि काही अतिउत्साही कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडीओ अजून दुसऱ्या ग्रुप मध्ये किंवा फेसबुकला पाठवत आहे.परंतु कांदा उत्पादक बांधवांनो लक्षात घ्या कांद्याची आवक जास्त होणे म्हणजे कांद्याचे बाजारभाव कमी होणे हे आपण वर्षानुवर्षे बघत आलेलो आहोत त्यामुळे कृपा करून घोडेगाव येथील कांद्याची गोणी घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा असूद्या किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार समितीमध्ये कांदा आवक होत असल्यास त्याबाबत सोशल मीडियावरती फोटो आणि व्हिडिओ अजिबात टाकू नये

सोशल मीडिया वरती कांद्याची खूप आवक झाली आहे अशी माहिती आपणच कांदा उत्पादकांनी टाकल्यामुळे कांद्याची जास्त आवक झाली आहे असे कारण सांगून आपल्याच कांद्याला व्यापारी बांधवांकडून लिलावामध्ये कमी भाव मिळतो म्हणून सर्व कांदा उत्पादकांना नम्र विनंती की आपण चुकूनही यापुढे कांद्याच्या पावत्या, कांद्याच्या वाहनांच्या रांगा याबाबत कोणत्याही प्रकारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवू नयेआणि आपलेच होणारे नुकसान 100% टाळावे

 

भारत दिघोळे

संस्थापक अध्यक्ष

-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

English Summary: Don't be fooled by onion growers, be careful! Be careful, avoid your own loss
Published on: 08 June 2022, 08:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)