ज्यावेळी आपण एखादे कीटकनाशक खरेदी करतो तर त्यावर कॉन्टॅक्ट किंवा सिस्टिमिक असे लिहिलेले असते.पण आपल्याला कोणते कीटनाशक कसे काम करते हे माहित असणे आवश्यक आहे. तर सिस्टिमिक हे कीटकनाशकाची फवारणी करतो त्यावेळी पिकावर किंवा वनस्पतीवर कशा प्रकारे काम करते याची माहिती असणे आवश्यक आहे.कीटकनाशकांवर लिहिलेल्या या सिस्टिमिक शब्दाचा अर्थ असा होतो की हे रसायन पाण्यात पुरेसे
विरघळणारे आहे की ते एखाद्या वनस्पतीद्वारे शोषल्यानंतर त्याच्या ऊतींमध्ये फिरू शकते. आंतरप्रवाही कीटकनाशकांची वनस्पतीमधील हालचाल, हि वनस्पतीतील इतर अन्नद्रव्यांसोबत,झायलेम-फ्लोएम या पाणी व अन्नद्रव्ये वाहून नेणाऱ्या उतींमधून झाडामध्ये सर्वत्र संक्रमित होतात.Xylem-Phloem is the tissue that carries water and nutrients throughout the plant.जर आपण एखादे आंतरप्रवाही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारणीच्या माध्यमातून किंवा आळवनीच्या माध्यमातून पिकांना देतो तेव्हा पानांच्या किंवा मुळांच्या संपर्कात येताच जलद गतीने ते वनस्पतीमध्ये शोषले जातात.
मग पानातून/मुळातून इतर अवयवांकडे प्रवाहित होतात.जसे खोड,फळे,फुले व संपूर्ण झाडांमध्ये पसरते.कोणत्या प्रकारच्या किडींचे निर्मूलन करते?आंतरप्रवाही कीटकनाशक जेव्हा फवारले जाते तेव्हा संपूर्ण झाडामध्ये पसरते. त्यानंतर अश्या झाडातील हरितद्रव्य जेव्हा रसशोषक किडीद्वारे शोषले जाते तेव्हा त्या किडींच्या शोषनलिका मधून कीटकनाशक त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. शोषनलिका ब्लॉक होऊन कीड मारून जाते त्यामध्ये मावा,तुडतुडे,पांढरीमाशी, फुलकिडे यांच्यासारख्या अनेक किडींचे निर्मूलन होते.
रसशोषक किडी ह्या विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून करतात.त्यामुळे हरितद्रव्याच्या शोषणासोबत त्यांच्या माध्यमातून विषाणूजनीत रोग पिकामध्ये झपाट्याने पसरवले जातात.आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या वापरामुळे कीड निर्मूलनासोबत विषाणूजन्य रोगांच्या प्रसाराला सुद्धा अटकाव बसतो. त्यामुळे रसशोषक -किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशके प्रभावी ठरतात.काही नियमित वापरली आंतरप्रवाही कीटकनाशके:एसिफेट,इमिडाक्लोप्रिड,थायोमिथोक्झीम
IPM SCHOOL
Published on: 26 July 2022, 08:40 IST