Agripedia

हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे काही

Updated on 08 April, 2022 9:58 PM IST

हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात गरजेचे पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी गरजेचे

काही एन्झाईम्स व प्रोटीन्सचा घटक आहे.

पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत गरजेचे आहे. सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या क्रियेत गरजे आहे.

चिकणमातीयुक्त जमिनीत ही खनिजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. परिणामी एकूण लोहसाठा अधिक दिसून येतो. मात्र, हे लोह पिकांना उपलब्ध स्वरूपामध्ये नसते. लोहाची गरज चुनखडीयुक्त जमिनी भागवू शकत नाहीत. म्हणून पिकांसाठी लोहयुक्त खतांचा वापर करावा लागतो.

वनस्पतीतील कार्य

पिकांच्या हिरव्या पानांचा लोह हा घटक नसला तरी अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उत्तेजकाचे कार्य करतो.

हरीत लवक निर्मितीत आणि हरीतलवकाच्या कार्यात लोह गरजेचे असते.

- पिकातंर्गत उर्जेच्या वहनासाठी लोह अन्नद्रव्य गरजेचे असते.

 लोह अनेक विकरांचा (एन्झायम्स) व प्रथिनांचा (प्रोटिन्स) घटक असून, इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव-रासायानिक क्रियेत भाग घेतो. पिकातंर्गत अन्ननिर्मितीसाठी आणि चयापचयाच्या क्रियेत लोह गरजेचे आहे.-

नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत लोह मदत करतो. 

फेरस (लोह) उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक –

जमिनीचा सामु – जास्त सामु असलेल्या जमिनीतील कार्बोनेटस् मुळे देखिल फेरसची उपलब्धता कमी होते.

फेरस स्फुरद संबंध – जास्त प्रमाणातील स्फुरदमुळे फेरसची उपलब्धता कमी होते.

नायट्रेट नत्राच्या वापारामुळे पिकातील धन-ऋण भार (अनायन-कॅटायन) असंतुलन निर्माण होवुन फेरसची उपलब्धता कमी होते.

फेरस मँगनीज संबंध – दोन्ही मुलद्रव्य विरोधात असल्याने एकाची जास्त उपलब्धता दुस-याची उपलब्धता कमी करते.

फेरस मॉल्बडेनियम – जास्त प्रमाणातील मॉल्बडेनियम मुळे पिकाच्या मुळांवर आयर्न मॉल्बडेट चा थर तयार होतो.

फेरसचे विविध स्रोत

प्रकार फेरसचे प्रमाण

फेरस सल्फेट 20%

फेरस अमोनियम सल्फेट 14%

आयर्न डीटीपीए चिलेट 10%

आयर्न एचईडीटीए चिलेट 5-12%

English Summary: Do you know this function of ferrous (iron) crop?
Published on: 08 April 2022, 09:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)