औषधी वनस्पतींचे महत्व तर आपल्याला माहीतच आहे. तुळशीसारख्या असंख्य औषधी वनस्पती आपल्या कामी येतात, आपल्याला त्या माहीत असतात. बऱ्याचदा वनस्पती त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे अधिक ओळखल्या जातात. त्यातीलच एक लाजाळू च झाड. लाजाळूची वनस्पती कोणाला माहित नाही. स्पर्श झाल्यास आपली पानं मिटवून घेणाऱ्या या लाजाळू वनस्पतीचे महत्व मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ही वनस्पती अतिशय औषधी गुणांनी युक्त आहे.
तर अशा बहुगुणी वनस्पतीचे आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला तिच्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. लाजाळू वनस्पतीत कटू आणि थंड हे गुणधर्म असल्यामुळे कफ, पित्त या आजारांवर मात करण्यासाठी उपयुक्त आहे. मूळव्याधीसारख्या रोगावर ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे. मूळव्याध झाला असेल तर या पानांची पावडर दुधासोबत घ्यावी.
मुतखडा तसेच अन्य कोणतेही मुत्र विकार असतील तर याच्या मुळांचा काढा करून पिल्याने आराम मिळतो. खोकला येत असेल तर या झाडाची पाने किंवा मुळ चाऊन खाल्यास आराम मिळतो. एखादी जखम झाली असेल तर अशा वेळी या झाडाची पाने वाटून त्याची पेस्ट जखमेवर लावल्यास त्यातून होणारा रक्तस्त्राव थांबतो.
आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मुळात ही वनस्पती दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची आहे, आता मात्र ती कुठेही उगवते.याशिवाय नवीन वैज्ञानिक शोधानुसार असे समोर आले आहे की,आपल्या शरीरातील हाडाचे तुटणे तसेच मांस पेशीतील समस्या दूर करण्यासाठी हे लाजाळूचे रोपटे फायद्याचे आहे.
खरंतर स्पर्श झाल्यास पाने मिटवून घेणे हा सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय आहे. स्वसंरक्षणासाठी ते झाड असं करत असावं असे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे यासाठी देखील ही वनस्पती असं करत असेल असा युक्तिवादही केला जातो. अशा प्रकारे लाजाळू वनस्पतीचे या गुणधर्मासोबत अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? फळगळीमुळे संत्रा उत्पादकांना बसला पाचशे कोटींचा फटका
मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! आता होणार नैसर्गिक शेती
शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच; धक्कदायक आकडेवारी आली समोर
Published on: 27 April 2022, 02:17 IST