सध्या खरीप हंगाम चालू आहे, दरम्यान मॉन्सूनही देशातील सर्व भागात पोहोचला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पेरणीची कामे ही पुर्ण होत आली आहेत. पण अद्याप काही शेतकरी अजूनही जैविक शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत. जैविक पद्धतीने करण्यात येणाऱ्या शेतीत उत्पादन खर्च कमी लागत असतो. यातील एक भाग म्हणजे बीजप्रक्रिया. यासाठी खूप दक्षता घ्यावी लागते. फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते तर बियाणे प्रक्रियेमुळे बियांवरील सुप्ताव्यस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जिवाणूंचे नियंत्रण सुरुवातीसच होते.
तत्पुर्वी बीज प्रक्रिया म्हणजे काय हे जाणून घेऊ. सर्वसाधरणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. बीजप्रक्रियामुळे अनेक फायदे होत असतात, याविषयीच आपण यया लेखात माहिती घेणार आहोत.
1) बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र जमिनीत स्थिर केले जात असल्यामुळे जमिनीला दिल्या जाणाऱ्या रासायनिक खतांची मात्रा कमी द्यावी लागते.
2)जैविक खत बीजप्रक्रियेमुळे जमिनीचे, पाण्याचे, तसेच हवेचे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही.
3)स्फुरद विरघळविणारे जिवाणू पिकांना अनुपलब्ध असलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात.
4)जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यास पिकांची उगवणक्षमता वाढते तशीच पिकांची जोमदार वाढ होते.
5)जैविक खतांची बीजप्रक्रिया केल्यामुळे जमीन सतत जिवंत म्हणजेच त्यापासून अधिक उत्पादकता किंवा उत्पन्न मिळविणे शक्य होते.
६) चांगल्या प्रकारचे घरगूती बियाणे तयार होईल, महागड्या बियाणांचा खर्च वाचेल.
७) जमीनी तुन किंवा बियापासून होणाऱ्या रोग व किडी यांचा प्रादुर्भाव टाळता येईल.
८) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
. वेगवेगळ्या खरीप पिकांसाठी जैविक खत बीजप्रक्रिया :
१ ) रायझोबियम जिवाणू खत बीजप्रक्रिया :
रायझोबियम हे जिवाणू डाळवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीत सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात.
उदा. सर्व डाळवर्गीय / द्विदल वर्ग पिके - सोयाबीन, तूर, मुंग, उडीद चवळी इत्यादी.
२)अॅझोटोबॅक्टर / अझेस्पिलीयम जिवाणू खत बीजप्रक्रिया :
अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळाभोवती असहजीवी पद्धतीचे नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. उदा. एकदल वर्ग पिके - कापूस, ज्वारी, मका, बाजरी, ऊस इत्यादी.
अझोस्पिरिलियन हे ही जिवाणू एकदल वनस्पतींच्या मुळांवर राहून नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करतात. उदा. ऊस, गवतवर्गीय पिके इत्यादी.
3) पी. एस. बी. जिवाणू खत बीजप्रक्रिया :
स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत बीजप्रक्रिया खरिपातील सर्व पिकांसाठी उपयुक्त अशी बीजप्रक्रिया आहे. बीजप्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य : रायझोबियम/ अॅझोटोबॅक्टर / अझोस्पिरिलियम / पी.एस.बी. यांचे विकत आणलेले पाकीट, गूळ, पातेले, प्लॅस्टिक ट्रे, पाणी, कागदी पेपर इ.
कशी करणार बीजप्रक्रिया
१) रासायनिक बीजप्रक्रिया केल्यास ३-४ तासांनंतर जैविक संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सर्वप्रथम पातेले घेऊन त्यामध्ये १ लीटर पाणी टाकून त्यामध्ये १२५ ग्रॅम गूळ टाकावा व हे द्रावण गूळ चांगला विरघळून घ्यावे.
2) नंतर पातेल्यात २५० ग्रॅम रायझोबियम किंवा अॅझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरीलियम + २५० ग्रॅम पी. एस. बी. टाकून हे द्रावण लाकडी काडीच्या साहाय्याने योग्य रीतीने ढवळून घ्यावे.
3)नंतर प्लॅस्टिक ट्रे-मध्ये १० किलो बियाणे घ्यावे व या बियाणांवर तयार केलेले द्रावण हाताने शिंपडून घ्यावे. नंतर दोन्ही हातांनी सर्व बियाणे योग्य पद्धतीने चोळावे की सर्व बियांवर लेप आलेला असेल.
4) प्रत्येक बी योग्यप्रकारे द्रावणाचा लेप आल्यानंतर हे बियाणे सुकण्यासाठी सावलीत कागदाच्या पेपरवर १५ मिनिटे टाकावे व सुकल्यानंतर याचा वापर पेरणीसाठी करावा. बुरशीनाशक- कीटकनाशक- जिवाणू संवर्धक आणि नंतर पी. एस. बी.चा वापर करावा. विविध पिकांमधील नत्र स्थिरीकरणाचे निष्कर्ष प्रति हेक्टरी
1) बरसीम २०० – २५० किलो नत्र /हेक्टरी
2) लसूण घास २००- २५० किलो नत्र / हेक्टरी
3) चवळी ४०-५० किलो नत्र / हेक्टरी
4) मूग ३५- ४० किलो नत्र / हेक्टरी
5) तूर ६०- ७० किलो नत्र / हेक्टरी
6) ज्वारी, बाजरी, मका १५ – ३५ किलो नत्र / हेक्टरी
7) सर्व पिकांसाठी स्फुरद ३०-३५ किलो नत्र / हेक्टरी
विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.)
लेखक
श्री. नितीन कोरनूळे (Msc Agri.) Botany , कृषी सहायक 7350987692 ,
डॉ. बैग सर (कापूस तज्ज्ञ CRS Nanded.)
श्री. वैभव भोसकर M.Sc.Agri ( किटकशास्त्र ) 9975243361.
Published on: 06 July 2020, 05:10 IST