Agripedia

काल दिनांक 24/01/2022 वार सोमवार रोजी , वॉटर संस्था व एल अँड टी यांच्या अर्थ साहाय्याने अंबड तालुक्यातील सहा गावामधे एकात्मिक समुदाय विकास प्रकल्प चालू आहे

Updated on 28 January, 2022 9:02 PM IST

काल दिनांक 24/01/2022 वार सोमवार रोजी , वॉटर संस्था व एल अँड टी यांच्या अर्थ साहाय्याने अंबड तालुक्यातील सहा गावामधे एकात्मिक समुदाय विकास प्रकल्प चालू आहे तर तेथील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माझ्या शेतात अंभोरा येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते,प्रमुख मार्गदर्शक कैलास किसनराव बंगाळे कार्यक्रमाचे आयोजक शरद अनंता पवार शिनगाव जहांगीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले जि.जालना, ता.अंबड येथील नागझरी,पिंपळगाव,आलमगाव, धनगर पिपरी,चांभारवाडी, 

साडे सावंगी गावातील जवळजळ ६० शेतकरी तसेच प्रकल्प अधिकारी माझ्या शेतात जवळजवळ पूर्ण एक दिवस वेळ दिला, त्याप्रमाणे माझ्या शेतातील पाणी नियोजन, गीर गाय संगोपन, गोमूत्र व शेन संकलन ,त्याबरोबर प्रत्येक हंगामातील पीके, कीड नियोजन, तन नियोजन, जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी पीक फेरबदल कसे करावेत व गांढुळ आणि सेंद्रिय कर्ब कसा वाढेल याबद्दल माहिती देण्यात आली. 

व माझ्या देऊळगाव राजा नॅचरल शेती माल विक्री केंद्राला सुद्धा भेट दिली व माझ्या तालुक्यातील आमचे मार्गदर्शक कृषी सहायक देशमुख बापू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

आणि म्हणतात ना की शेती ही करून पाहिल्या शिवाय जमत नाही, तचेच शेती ही विना अभ्यासाशिवाय ही होऊ शकत नाही, आणि शेतीतला अभ्यास हा कितीही केला तरी कमीच आहे .

आणि मला कालचा कार्यक्रम मुळे भरपूर गोष्टी त्या शेतकरी बंधू आणि भगिनीं ला देण्याचा योग आला. व घेण्याचा योग आला आणि अनमोल वेळ देऊन व सन्मान देऊन मला प्रोसहान दिले त्यामुळं मी त्याचा शत: शत आभारी राहील.

 

आपलाच:-कैलास किसनराव बंगाळे

 मु.पो.सिनगाव (जहा) ता.देऊळगाव राजा , जि. बुलढाणा.

 मो.नं. 7798207402

देऊळगाव राजा नॅचरल

English Summary: Do work live and work in live its difference
Published on: 28 January 2022, 09:02 IST