Agripedia

राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर,

Updated on 27 September, 2022 7:57 PM IST

राज्यात वाटाणा पिकाचे उत्पादन हे बडोदे, खान्देश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असल्याने सरासरी तापमान १o° ते १८° से तापमानात या पिकाची चांगली वाढ होते. कडाक्याची थंडी व धुके यांमुळे पिकावर दुष्परिणाम होतो. फुले येण्याच्या वेळेस उष्ण हवामान असल्यास शेंगांत बी भरत नसल्याने वाटाण्याची प्रत कमी होते. त्यामुळे योग्य वातावरण बघून या पिकाची लागवड करावी.

जमीन व पूर्वमशागत वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी चांगल्या निच-याची ५.५ ते ६.७ सामू असलेली जमीन निवडावी. वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले,Although the pea crop can be grown in all types of soil, तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते.

सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार? बघा सविस्तर

हे पीक चांगले उत्पादनशील पीक असल्याने त्यासाठी पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी हेक्टरी २५ गाड्या शेणखत व पाणी द्यावे व वाफसा झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होते.

लागवडीचा हंगामवाटाणा पिकाची वर्षातून दोन हंगामांत लागवड केली जाते. राज्यात हे पीक खरीप हंगामात जून-जुलैमध्ये तसेच हिवाळ्यात ठरते. वाटाण्याचे पीक हे एकदल पिकानंतरच घ्यावे. वाटाणा हे पीक वांगी, कांदा, टोमॅटो,बटाटा, कांदा अशा रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडणा-या पिकांनंतर घेऊ नये.वाटाण्याचे प्रकार व सुधारित जातीअ) बागायती किंवा भाजीचा वाटाणा (गार्डन पी)ब) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा (फिल्ड पी)

सुधारित जाती -अरकेल : या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ ते ७ सेंमी. लांबीच्या असतात. झाडांची उंची ३५ ते ४५ सेंमी. असून ५० ते ५५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.बोनव्हेला : शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस तयार होतात.जवाहर - १ : शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमी. पर्यंत. लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरवात होते.

English Summary: Do this pea cultivation and management and get rich income
Published on: 27 September 2022, 07:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)