Agripedia

या वर्षी प्रजन्यमान जास्त असून जून सुरुवाती पासून जमिनी ओल्या असल्यामुळे

Updated on 26 August, 2022 11:17 AM IST

या वर्षी प्रजन्यमान जास्त असून जून सुरुवाती पासून जमिनी ओल्या असल्यामुळे रोगकारक बुरशींचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक पिकावर मर रोगाचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे. कांदा रोप मर रोगास लवकर बळी पडत असल्यामुळे बियाण्याची नर्सरी तयार करतांना काळजी घेतली तरच चांगल्या प्रतीचे रोप तयार होईल अन्यथा महागडे बियाणे घेऊन हाती निराशा येण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा रोप खराब झाल्याचे उदाहरण सध्या पहायला मिळत आहेत. सुद्दढ रोप निर्मितीसाठी अनुभव सिद्ध व्यवस्थापनाची कास धरा व उत्तम रोप तयार करा. 

नर्सरी तयार करतांना निचऱ्याची जमीन निवड करावी, मशागत करून वाफे तयार करावेत.While preparing the nursery, one should choose a draining land, cultivate it and create steam.बियाणे टाकण्याआधी १ - कुजलेले शेणखत - उपलब्धतेनुसार २०० ते ५०० कि. घेऊन त्यात बायोमिक्स २.५ किलो मिसळून पसरावे.बायोमिक्स हे जमिनीतल्या २२ उपयुक्त जिवाणूंचे मिश्रण आहे. यामुळे मर रोगाच्या बुरशींचा अटकाव होतो व मर येत नाही.२.नर्सरीसाठी खत व्यवस्थापन.सप्लिमेंट - २५ किलो किंवा सुपर फॉस्फेट १०:२६:२६ - १० किलो अर्कोमींन - १ किलो ह्युमिसोल जी - ५ किलो एकत्र करून वाफ्यात पसरावे. 

३. यानंतर बीज प्रक्रिया करावी.चर किलो बियाणे प्लॅस्टिकच्या पेपर वर घ्यावे त्यावर ५० मिली गुळाचे पाणी शिंपडावे, हाताने मिसळून झाल्यावर त्यावर १०० ग्रॅम बिजोपचार पावडर टाकून हलके हाताने चोळून घ्यावे व लगेच जमिनीत फोकून मिसळून पाणी भरावे.४.) १२ - १३ दिवसांनी १९:१९:१९ - ५ ग्रॅम + अर्कोमींन गोल्ड - १ ग्रॅम प्रति लिटर फवारणी घ्यावी. अन्नद्रव्य फवारणी.५). १४ - १५ दिवसांनी ट्युबिकोनोझोल २५.९% ई.सी. (टेबुरा / फॉलिक्युवर) - १ मिली + सुडो.एफ.एल - ५ मिली

+ डेसीस - १ मिली + दूध - ५ मिली प्रति लिटर पाणी दाट फवारणी घ्यावी.६.) २० - २२ दिवसांनी अमोनियम सल्फेट / युरिया - १० किलो + मॅग्नेशियम - ३ किलो एकत्र करू पाण्याबरोबर घ्यावे.७).२५ - ३० दिवसांनी जैविका - ५ मिली + सुडो - ५ मिली + इमीडा ०.५ मिली प्रति लिटर पाणी फवारणी घ्यावी. ८). ३२ - ३५ दिवसांनी १३:०:४५ - ५ ग्रॅम अर्कोमीन - १ ग्राम प्रति लिटर पाणी.वरीलप्रमाणे नियोजनाने अत्यंत सुद्दढ रोप तयार होईल.

 

अधिक माहितीसाठी संपर्क

श्री.पंकज पवार

आर.बि.हर्बल ॲग्रो,सटाणा

02555-225205,8805613418

English Summary: Do this onion nursery management and earn lots of money
Published on: 26 August 2022, 11:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)