देशातील शेतकरी बांधव आता शेती क्षेत्रात मोठा अमुलाग्र बदल घडवून आणत आहेत, पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आता शेतकरी बांधव आधुनिकतेची कास धरत आहेत. शेती पद्धतीत आधुनिक बदल आत्मसात करून शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आहेत. पारंपरिक पिकांना मोठा उत्पादन खर्च येत असतो शिवाय त्यातून कवडीमोल उत्पन्न पदरी पडत असल्याने उत्पादन खर्च काढणे देखील मुश्कील होऊन बसले आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे आणि नगदी पिकांची लागवड करायला सुरुवात केली आहे.
शेतकरी बांधव आता अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची लागवड करताना बघायला मिळत आहेत. अशा अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांपैकी एक आहे टरबूज अर्थात कलिंगड. देशात अलीकडे टरबूजचे क्षेत्र वाढले आहे. कलिंगडची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश राजस्थान कर्नाटक पंजाब आणि हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात नजरेस पडते. असे असले तरी याची लागवड महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बघायला मिळाले आहे. कलिंगड शेतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी खूपच कमी वेळ लागतो शिवाय कलिंगडच्या पिकाला अल्प प्रमाणात खाद्य असले तरीदेखील त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त करता येते. याव्यतिरिक्त कलिंगडच्या पिकाला खूपच कमी पाणी आवश्यक असते त्यामुळे अलीकडे शेतकरी बांधव या पिकाची लागवड करताना बघायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, कलिंगडच्या सुधारित जातींची लागवड केली तर त्यापासून अल्पकालावधीत दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. उन्हाळ्यात कलिंगडची विशेष मागणी असते, त्यामुळे शेतकरी बांधव उन्हाळी हंगामात कलिंगड लागवड करून चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात.
कलिंगड लागवडीसाठी उपयुक्त हवामान
कलिंगड लागवडीसाठी गरम आणि सरासरी आद्रता असलेले हवामान उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले आहे. कृषी तज्ञांच्या मते, 25 ते 32 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान कलिंगडच्या शेतीसाठी उपयुक्त असते. या तापमानात कलिंगडची लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. कलिंगडची लागवड वाळूमिश्रित जमिनीत तसेच वाळूमिश्रित चिकन माती असलेला सुपीक जमिनीत केल्यास त्यापासून चांगले उत्पादन प्राप्त होते. कृषी तज्ञ याची लागवड नदीकिनारी करण्याचा सल्ला देतात.
पूर्वमशागत
याची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करावी लागते, याची लागवड करण्याआधीजमीन व्यवस्थीत नांगरून घेतली पाहिजे. जमिनीची नांगरणी झाल्यानंतर त्यामध्ये जुने कुजलेले शेणखत टाकण्याचा सल्ला दिला जातो. कृषी तज्ञांच्या मते, जमिनीच्या वरच्या पृष्ठभागावर जर जास्त वाळू असेल तर तो पृष्ठभाग बाजूला सारून खालच्या माती असलेल्या थरात शेणखत टाकले गेले पाहिजे.
लागवड केव्हा
उत्तर भारतातील मैदानी भागात फेब्रुवारीमध्ये टरबूजाची लागवड केली जाते, कृषी वैज्ञानिक देखील फेब्रुवारीमध्ये उत्तर भारतातील मैदानी भागात कलिंगड लागवडीचा सल्ला देतात. याशिवाय नद्यांच्या काठावर जर लागवड करायची असेल तर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत लागवड करावी. डोंगराळ भागात कलिंगडची लागवड मार्च ते एप्रिल महिन्यात करण्याचा सल्ला दिला जातो.
Published on: 16 February 2022, 10:27 IST