शेतीचा व्यवसाय करत असाल आणि पारंपारिक शेतीतून अधिक उत्पन्न मिळत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही एक जबरदस्त आयडिया घेऊन आलो आहोत. तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. जिथे आपण कमी पैसे खर्च करून जास्त पैसा कमावू शकता. यासाठी फायदेशीर आयडिया काकडीची शेती (Cucumber Farming) आहे. जर तुम्हाला बिझनेसमधून अल्पावधीत बंपर फायदा कमवायचा असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठीच आहे असं समजा.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत आपण पाहिलं तर दुपारच्या वेळेस जेवणामध्ये काकडीचे दर्शन बहुदा होतेच. उन्हाळ्यात काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडी खाल्ल्याने शरीरात काकडीच्या शेतीमधून नफा कमावण्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहण्याची आवश्यकता नाही. काकडीची लागवड केल्यावर चार महिन्यांच्या नंतर तुम्ही जवळपास 8 लाख रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. तुम्हाला फक्त काहीतरी हटके करण्याची गरज आहे म्हणजेच नव्या पद्धतीची शेती करणं आवश्यक आहे, ते काय आता आपण उदाहरणाने पाहू.
उत्तर प्रदेशमधील एका शेतकऱ्याने नेदरलँड्समधून आणलेल्या विशिष्ट प्रकारच्या काकडीच्या बियाण्याची लागवड करून भरघोस नफा कमावला आहे. काकडी विकण्याचा व्यवसाय केला तर यात फायदाच फायदा आहे. काकडी लागून ती तयार होण्यासाठी कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 80 दिवसांचा कालावधी लागतो. जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 पर्यंत असणे उत्तम मानले जाते.काकडीची शेती नदी आणि तलावाच्या शेजारीही करता येऊ शकते.त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम शेडनेट हाऊस तयार केले पाहिजे. उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गा प्रसाद यांनी या शेतीसाठी शेतामध्येच शेडनेट तयार केला आहे. त्यानंतर त्यांनी नेदरलँडहून 72 हजार रुपयांचे बियाणे मागवले.
बियाणे लावल्यापासून चार महिन्यांनंतर त्यांनी 8 लाख रुपयांच्या काकड्यांची विक्री केली आहे. तसं बघायला गेलं तर काकडी पिकाची मागणी उन्हाळ्यात जास्त असते, म्हणून हिवाळ्यात लागवड केली कि उन्हाळ्यात तुम्हाला काकडी खाण्यासाठी येईल किंवा पावसाळ्यामध्ये देखील काकडीची शेती करू शकता.काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीमध्ये तुम्हाला करता येईल. काकडीची शेती नदी आणि तलावाच्या शेजारीही करता येऊ शकते. साधी काकडी 20 रुपये किलो प्रमाणे सध्या विकली जातेय, मात्र नेदरलँड्समधील बी असलेली की काकडी 40 ते 50 रुपये प्रति किलोच्या दराने विकली जाते. तसेच तिला वर्षभर मागणी असते. अशा रीतीने काकडी म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने 12 महिने फायदेशीर असल्याने तिला नेहमी मागणी असते.
Published on: 13 June 2022, 05:50 IST