Agripedia

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हे महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते.

Updated on 21 June, 2022 4:38 PM IST

कोरडवाहू फळझाडांमध्‍ये सिताफळ हे महत्‍वाचे फळपिक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने अवर्षणग्रस्‍त भागात आणि हलक्‍या जमिनीत केली जाते.फळबागांचे प्रस्‍थ विशेषतः कोरडवाहू भागात, पडिक आणि वरकस जमिनीत मोठया प्रमाणात वाढविणे ही आजच्‍या काळातील नितांत गरज होऊन बसली आहे.फार प्राचिन काळापासून सिताफळासारखे जंगल, द-या खो-यातले हेक्‍टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्‍या गरीबांचा रानमेवा म्‍हणून वरदायी ठरलेले आहे.सिताफळाच्‍या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत. पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो.ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्‍या महिलांना करण्‍यासारखा आहे. सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्‍हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्‍या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्‍याच्‍या धंदयात देखिल वापरात आणता येते.

सिताफळाची लागवड शास्‍त्रीय दृष्‍टया पुढिलप्रमाणे करता येते.हवामान व जमीन - महाराष्‍ट्रातील हवामानाचा विचार करता,सिताफळाची लागवड होण्‍यास भरपूर वाव आहे.अत्‍यंत कोरडया रखरखीत व उष्‍ण हवामानाच्‍या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्‍या हवामाना पर्यंतच्‍या प्रदेशात सिताफळ वाढते.मात्र उष्‍ण व कोरडया हवामानातील सिताफळे चविला गोड आणि उत्‍कृष्‍ट दर्जाची गुणवत्‍तेच्‍या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. कोकणासारख्‍या जास्‍त दमटपणा असलेल्‍या भागाताही हे झाड वाढते. पण अशा हवामानात तेथील फळे आकाराने लहान येतो.आकाराने लहान असलेले हे फळझाड दमट हवामानामध्‍ये नेहमी हिरवेागर राहते. कमी पावसाच्‍या प्रदेशामध्‍ये डिसेंबर ते फेब्रूवारी या काळात त्‍याची पान गळती होऊन झाडे विश्रांती घेतात. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही. थंड हवामानामध्‍ये फळे घट्ट व टणक राहून पिकत नाहीत.मोहोराच्‍या काळात कोरडी हवा आवश्‍यक असते. पावसाळा सुरु झाल्‍याखेरीज झाडांना फलधारणा होत नाही. सिताफळाचे झाड अवर्षणाला उत्‍तम प्रतिसाद देत असले तरी अति-अवर्षण मात्र या झाडाला अपायकारक ठरते. साधारणपणे झाडाच्‍या वाढीसाठी 500 ते 750 मिमि पाऊस आवश्‍यक असतो.

सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्‍त भागासाठी शिफारस केली असल्‍यामुळे हेक्‍टरी फळझाड कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड वाढू शकते.अत्‍यंत हलक्‍या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरतात.जाती - सिताफळाच्‍या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. अधिक उत्‍पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठया फळाची चांगल्‍या गराची (48 टक्‍के ) जात असून आपल्‍या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. अर्का सहान, अॅनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, अॅर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787 इ. जाती आहेत.सुधारीत जाती - च्‍या नामवंत प्रचलित जाती बहूधा संशोधनातून विकसित झालेल्‍या नाहीत.

आंध्रप्रदेशातील बाळानगर किंवा मॅमॉथ हया जाती उत्‍पादन व दर्जाचे दृष्‍टीने चांगल्‍या आढळून आलेल्‍या आहेत.वॉशिंग्‍टन पी-1,बारबाडोस या सुध्‍दा सुधारित जाती विकसित केलेल्‍या आहेत.अभिवृध्‍दी - सिताफळाची लागवड प्रामुख्‍याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते.ताजे बी तीन दिवस पाण्‍यात भिजून घालून नंतर पेरावे.रोप गादीवाफयावर किंवा पॉलिथीनच्‍या पिशवीत तयार करून पावसाळयामध्‍ये शेतात कायमच्‍या जागी लावावीत.ही रोपे पावसाळा संपल्‍यानंतर एकदा जगली की नंतर अवर्षणाला तोंड देत वाढू शकतात. सिताफळाचे डोळे भरून किंवा मृदुकाष्‍ट कलम सुध्दा करतात. कलमे करण्‍यासाठी स्‍थानिक सिताफळाचे खुंटाचा वापर करता येतो. त्‍याचप्रमाणे सिताफळाची अभिवृध्‍दी छाटे वापरून देखिल करता येते.मात्र छाटयांची अभिवृध्‍दी सहजासहजी होत नाही.छाटे घेण्‍यापूर्वी फांद्या जमिनीत गाडून नंतर त्‍या फांदयाची छाटे घेवून त्‍यांना 5000 पीपीएम एन ए ए चा वापर करून अतिसुक्ष्‍म तुषारगृहामध्‍ये ठेवल्‍यास छाटयांना मुळया फूटतात. सिताफळाच्‍या अभिवृध्‍दीसाठी डोळे भरणे, मृदकाष्‍ट आणि भेट कलम याव्‍दारे छाटयांपेक्षा अधिक यश मिळते.

English Summary: Do this by planting custard apple
Published on: 21 June 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)