Agripedia

पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत.

Updated on 20 September, 2021 8:01 AM IST

विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात.

       विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत.

    पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात.

   भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात.

 अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात.

प्रमुख विद्राव्य खते :-

    १९:१९:१९, २०:२०:२० ः या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. 

विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात.

       विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत.

    पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात.

भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात.अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात.

प्रमुख विद्राव्य खते :-

    १९:१९:१९, २०:२०:२० ः या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. 

१२:६१:० :- या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.

   ०:५२:३८ : या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. 

     १३:०:४५ :- या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

    ०:०:५०:१८ :- या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते. 

    १३:४०:१३ :- कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

कॅल्शियम नायट्रेट :

     मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

    २४:२८:०: यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

English Summary: do the well management of liquid fertilizers (1)
Published on: 20 September 2021, 08:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)