Agripedia

आडसाली ऊसासाठी जमिनीची पूर्वतयारी करत असताना डिसेंबर/जानेवारी दरम्यान ऊस तुटला असेल तर हरभरा पीक घ्या.

Updated on 27 August, 2022 8:38 PM IST

आडसाली ऊसासाठी जमिनीची पूर्वतयारी करत असताना डिसेंबर/जानेवारी दरम्यान ऊस तुटला असेल तर हरभरा पीक घ्या.बेवड साठी फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यापर्यंत हरभरा केला तरी चालू शकते.डिसेंबर,जानेवारी मध्ये केलेल्या हरभऱ्याचे बऱ्यापैकी उत्पादन मिळते. किमान पूर्वमशागतीचा खर्च त्यामधून निघतो.फेब्रुवारी महिन्यात हरभरा केलेला असेल तर फार उशीर झाल्यामुळे उत्पादन फारच कमी येते. काढणी ,मळणी परवडत नाही अशावेळी 65दिवसाच्या आसपास घाटे भरल्यानंतर नांगरी मागे हरभरा मुजवून घ्या. 1एकर हरभरा एकरीं 10ट्रेलर शेणखतला ऐकत नाही.

हरभरा पीक घेतल्यामुळे जमीन खोलवर भेगाळते व 2फुटाखालील कठीण तळी ब्रेक होते. व जमिनीचे नैसर्गिक सबसोयलरचे काम होते. The soil had a natural subsoiler function.जमिनीतील ओलावा नाहीसा होऊन जमीन एकदम कडक वाळते. नांगरट करत असताना मोठं मोठी ढेकळ निघतात. हरभरा काढणी मळणी झाल्यानंतर लगेच नांगरट सुरू करा.नांगरटीला विलंब झाला तर नांगरटीला फार दमणूक होते.जमिनीच्या पूर्वमशागती साठी दोनदा उभी आडवी नांगरट करा. पहिली नांगरट खोल करा.म्हणजे दुसरी नांगरट चांगली होते.कमी रुंदीचे व जास्त लांबीचे क्षेत्र

असेल तर त्या ठिकाणी उभी आडवी नांगरट करणे शक्य नसते. त्या ठिकाणी उभी नांगरट आलटून पालटून दोनदा करा.उदा. समजा जमीनीची लांबी पूर्व पश्चिम असेल तर पहिली नांगरट दक्षिणे कडून उत्तरेकडे केली असेल तर दुसरी नांगरट उत्तरे कडून दक्षिणेकडे करा.एकदम भारी पाणी साचून राहणारी कमी निचऱ्याची जमीन असेल तर त्या ठिकाणी सबसोयलरचे वापर करून नांगरट करा.दुसरी नांगरट करण्याआधी रोटावेटर मारून एकरीं 5ते6ट्रेलर शेणखत किंवा 10टन प्रेसमड पासून तयार केलेले कंपोष्ट खत टाकून दुसरी नांगरट करून खते

मातीआड करा.किंवा दुसरी नांगरट झाल्यानंतर सरी सोडण्या आधी रोटावेटर मारून शेणखत/कंपोष्ट खत टाकून घ्या. व नंतर खुरुट मारून खते मातीआड करून सरी सोडा.सर्वात महत्वाचे म्हणजे हराळी,व लव्हाळा (नागरमोथा) या तणांचा पूर्ण बंदोबस्त करा हराळी जास्त प्रमाणात असेल तर काशा वेचुन घ्या. शेतामध्ये गोडव तण कितीही असुदे ते आपण नियंत्रित करू शकतो.परंतु हराळी, लव्हाळा जर जास्त प्रमाणात असेल तर ते कुठल्याच पिकाला सुधारू देत नाही.लव्हाळा सकाळी खुरपुन काढले तर

संध्याकाळ पर्यंत फुटून वरती येते.इतकी त्याची वाढ जलद होत असते.त्यामुळे ऊसाला टाकलेली खते ऊसाला व्यवस्थित मिळत नाहीत.मात्र हराळी व लव्हाळयाची वाढ ऊसापेक्षा जोमदार होते. त्यामुळे पूर्व मशागत चांगली झाली तर या तणांचा कायमचा बंदोबस्त होतो.लव्हाळा जास्त प्रमाणात असेल तर हरभरा पीक करा, लव्हाळा नष्ट होतो.जमिनीची पूर्व मशागत चांगली करणे ऊसाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे.

 

शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.  

रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली

मोबा:- 9403725999,

मोबा79 7261 1847

English Summary: Do the sugarcane crop planning and get the yield of 100 tons of sugarcane per acre
Published on: 27 August 2022, 08:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)