Agripedia

पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी ढग येतात. त्यासोबत येणार्या बुरशीचे अंडे व जंतुच्या पेशी वाऱ्यासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात.

Updated on 30 January, 2022 9:21 PM IST

पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी ढग येतात. त्यासोबत येणार्या बुरशीचे अंडे व जंतुच्या पेशी वाऱ्यासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात. जर आपण या बियांवर संस्कार केले नाही व आहे तसेच पेरले तर बियासोबत ह्या सगळ्या हानिकारक बुरशी जमिनीत जातात.

 

बनविण्याची प्रक्रिया

बीजामृत - प्रमाण 100 किलो बियाण्यासाठी.  

20 लीटर पाणी + 5 किलो देशी गायिचे शेन + 5 लीटर देशी गायिचे गोमुत्र + 50 ग्रॅम कळीचा चुना + मुठभर बांधावरची जिवाणू माती (चुना पाण्यात निवळु दया व नंतरच त्याला मिश्रणात टाका.)हे मिश्रण चांगले मिसळून घ्या व ढवळतांना डावीकडून उजवीकडे ढवळा.ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व सावलीत रात्रभर ठेवा.दुसऱ्या दिवशी बीजसंस्कार करा.

बीजामृताचा वापर 

1. ग्रामीणी कुळातील पीकं(गवतवर्गीय)तृणवर्गीय धान्य पीकं (भात,गहू,ज्वारी,रागी,ऊस,बाजरी,मका इ.)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.

2.तेल वाण:(शेंगदाने व सोयाबीन सोडून)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या, ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.

शेंगदाने व सोयाबिन यांची टरफल खुप पातळ असतात व ती संस्कार करते वेळी टरफल निघण्याची शक्यता जास्त असते.जेवढे बियाणे आहे त्याच्या 10% घनजीवामृत एका डब्यात भरा व हळुच हलवा व ते पेरा .

3.कडधान्ये:

कडधान्याचं बी घ्या.थोड पसरा व अंदाजाने बीजामृत शिंपडा,दोन्ही हाताने घासू नका त्यामुळे टरफल निघतात. तर दोन्ही हाताची बोटे पसरवा व बोटांनी हळूच वरखाली करा व सावलीत सुकवा आणी पेरा.

4.केळी चे कंद: (ऊसाचे बेणे, अद्रक, हळदं)वेळूच्या टोपली मध्ये बेणे घ्या व बेण्यासकट टोपले काही सेकंद बुडवा आणि लगेच लावणी करा.

5.भाजीपाल्याचे बी:(मिरची, टमाटर, वांगे, गोबी, फुलगोबी, कांदे, झेंडू.)यापैकी निवडलेल्या पिकाचे बी घ्या त्याच्यावर थोडे बिजामृत शिंपडा आणि हाताने संस्कार करा व सावलीत वाळवा आणि रोप वाटिकेमध्ये पेरा.

6.रोप लावणीच्या वेळी:रोप वाटिकेतून रोप उपटल्या नंतर रोपांच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी करा. साळीच्या किंवा धनाच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावा.

गुलाब, द्राक्ष, पानवेल, मिरी, पांढरी मिरी, पान पिंपरी, व्हेनिला, शेवगा, गिरिपुष्प रताळं , समस्त फांदी कलमा बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी करा.

फळ झाडांच्या बीया बीजामृतामध्ये संस्कार करून लावाव्यात.

नारळ, सुपारी यांचे अंकुर बाहेर येर्इपर्यंत बुडवुन ठेवा व लावा.

बीज संस्कार का करावे ?

पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी ढग येतात. त्यासोबत येणार्या बुरशीचे अंडे व जंतुच्या पेशी वाऱ्यासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात. जर आपण या बियांवर संस्कार केले नाही व आहे तसेच पेरले तर बियासोबत ह्या सगळ्या हानिकारक बुरशी जमिनीत जातात व अनुकुल स्थिती मिळताच पसरतात व रोपांच्या मुळीमध्ये घुसतात व सगळया पानांवर चट्टे पडतात व पाने गळून पडतात. जमिनीमध्ये देशी गायचं शेन व गोमुत्र असल्यामुळे बिंयावरच्या सगळया बुरशी नष्ट होतात व गोमुत्र जंतुरोधक असल्यामुळे जंतुचा नायनाट होतो व बी पुर्ण शुद्ध होते.

 

गजानन खडके

  9422657574

 नैसर्गिक विषमुक्त शेती,महाराष्ट्र.

English Summary: Do taboos on seeds
Published on: 30 January 2022, 09:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)