Agripedia

हरबरा पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते,

Updated on 12 October, 2022 8:11 PM IST

हरबरा पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्यातच होणे अपेक्षित असते, त्यादृष्टीने बियाणे निवड असेल तसेच वाण निवड असेल याचे नियोजन करणे आवश्यक आहे,पेरणीसाठी बियाणे निवड आणि बीजप्रक्रिया हे खूप मह त्त्वाचे असते. हरबरा वाण निवड करता असताना दोन प्रकारचे असतात टपोरे दाणे म्हणजे काबुली व. लहान दाणे म्हणजे दाळी साठी वापरल्या जाणाऱ्या जाती. आपल्या कडे उपलब्ध असलेली जमीन व पाणी यानुसार वाण निवड करावी.हरबरा वाण निवड

१. भारी जमीन ( २ पाणी देणे शक्य असेल तर)फुले विक्रांत, फुले दिग्विजय , फुले विक्रम Heavy soil (2 if possible to water) Phule Vikrant, Phule Digvijay, Phule Vikram , PKV कनक हे वाण निवडावेत मध्यम जमीन - फुले विजय,जाकी-९२१८ , फुले राजविजय, फुले विश्वराज,फुले विक्रम लकी व भुरकी ( बरड) जमीन असेल

रब्बी मध्ये करा या पद्धतीने सूर्यफूल लागवड, आणि कमवा बक्कळ पैसा

 तर हरबरा पेरणी करणे टाळावे त्याठिकाणी दुसरे पीक घ्यावे. लागवड करताना ४५ १० सेमी किंवा ३० १५ सेमी अशी पेरणी करावी.विक्रम व कनक या वाणासाठी थोडे जास्त अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु ६० सेमी पेक्षा जास्त ठेवू नये. लागवड केल्यास ४५ १० ते १५ सेमी अंतरावर लागवड करावी.

बियाण्याचे प्रमाण : @ काबुली वाण ( टपोरे दाणे ) - १०० किलो / हेक्टरी ( ३५-४० किलो एकरी )@ हरबरा ( लहान दाणे ) - ६५-७५ किलो / हेक्टरी ( २५-३० किलो एकरी ) पेरणपूर्वी बियाण्याची उगणक्षमता बघून व बीज प्रक्रिया करून च पेरणी करावी .मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे तरच यावर आपल्याला नियंत्रण करता येते बीज प्रक्रियेसाठी Carbendazim 25 %+ Mancozeb 50 % WS (Sprint) 3 ग्राम प्रती किलो किंवा Carbendazim २-३

ग्रॅम प्रति किलो किंवा Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS (xelora) २-३ ml प्रती किलो किंवा Penflufen 13.28% ww + Trifloxystrobin 13.28% ww FS, (Ever gol extend ) ० .५ ते १ ml प्रती किलो बियाणे तसेच Thimethoxum ३० FS ५ -७ ml प्रती किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.त्यनंतर पेरणी करण्याच्या १ तास अगोदर Rhizobium ( जैविक खत ) २०० -२५० ग्रॅम १० किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी व सावली मध्ये वाळवून नंतर पेरणी करावीी. पेरणी करत असताना किंवा नंतर Trichoderma viridi

एकरी ४-५ लिटर किंवा किलो गांडूळ खतामद्ये मिसळून टाकावे किंवा sprinkler च्या पाण्यातून सोडावे मर व कॉलर रॉट या दोनही रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी जैविक बुरशीनाशक म्हणून trichoderma viridi काम करते त्यामुळे त्याचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते हरबरा पिकला रासायनिक खत जास्त नाही दिले तरी चालते परंतु २५:५०:०० किंवा २०:४०:२० नत्र : स्फुरद : पालाश किलो प्रति हेक्टर प्रमाणे खत देणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी आपण १२:३२:१६ ५०-६० किलो किंवा DAP ५०-६५ किलो प्रती एकर

दिले तरी चालेल .युरिया किंवा पोटॅश देण्याची गरज नाही. जर आपल्या जमिनीत अन्नद्रव्ये कमतरता असेल तर सल्फर १० किलो किंवा झिंक ५ किलो यांचा वापर करू शकता. सल्फर व झिंक चा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडते.हरबरा पीकामध्ये मर रोग व्यवस्थापन महत्वाचे आहे त्यासाठी बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे वरील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी व पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी Trichoderma viridi चे ड्रेंचींग करावे ( पाण्यासोबत) किंवा १०-२० किलो ओली

माती किंवा ५० किलो गांडूळ खत घेऊन त्यामधे ४ किलो किंवा ४ लिटर trichoderma viridi यांचे मिश्रण बनवून शेतामध्ये ओलावा असताना धुरळणी करावी. ( हे सर्व रोग येण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे).हरबरा पिकला जास्त पाणी देऊ नये फक्त २ पाणी द्यावेत.पाणी देण्यासाठी स्प्रिकलर चा वापर केल्यास फायदा होतो तसेच शेंडे खुडने सुध्दा महत्वाचे असते. कीड - रोग व्यवस्थापन करण्यासाठी शिफारशीत उपाययोजना कराव्यात.अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्कीच उत्पादनात वाढ होईल. 

 

डॉ अनंत उत्तमराव इंगळे

Ph.D. Genetic and Plant Breeding MPKV Rahuri,

( VADF Chikhli) 

English Summary: Do so Harbara seed (variety) selection and seed processing
Published on: 12 October 2022, 03:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)