आज गरज ही आपली आहे, पीक उत्पादनात जमिनीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जमिनीचे स्वास्थ्य सुपीक असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तुत लेख माती परीक्षणाचा आधारित आहे. सदर लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना माती परीक्षण, माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना कसा घ्यावा, माती परीक्षण घेताना घ्यावयाची काळजी, माती परीक्षण तपासणीसाठी पाठवण्याचे विशेष बाबी, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची विस्तृत माहिती मिळणार आहे. माती परीक्षणानंतर जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्न्द्रव्यांची कमतरता
अथवा त्याअनुषंगाने पीक उत्पादन वाढीसाठी खतांचा पुरवठा आणि एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.
माती परीक्षण म्हणजे काय?
शेतातील मातीच्या नमुन्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेस माती परीक्षण असे म्हणतात.
माती परीक्षण ही जमिनीचे रासायनिक विश्लेषण करण्याची एक जलद पद्धती आहे, शेतजमिनीची पिकांना निरनिराळी अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता काढणे, यालाच माती परीक्षण किंवा मृदा चाचणी असे म्हणतात.
माती परीक्षणाचे उद्देश
माती परीक्षणात पृष्ठभागावरील मातीचे नमुने घेऊन त्या मातीचा कस (सुपीकता) अजमाविला जातो. माती परीक्षणाचे उद्देश
मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे.
रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात येते.
जमिनीची उत्पादनक्षमता समजते.
जमिनी क्षारयुक्त व खारवट याबाबत माहिती समजते.
रासायनिक खतांची मात्रा देता येते.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते.
माती परीक्षण महत्त्व
शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून तिची उत्पादनक्षमता वाढते.
योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो.उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन क्षारयुक्त किंवा खारवट जमिनीबाबत माहिती घेता येते.
अन्नद्रव्यांचा अभाव असल्यामुळे पुढील योग्य त्या सुधारणा करता येते.जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
Mission agriculture soil information
मिलिंद गोदे
Published on: 15 February 2022, 09:00 IST