Agripedia

कार्ली व दोडका या सारख्‍या वेलभाज्‍यांना मांडव बांबू इत्‍यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो.

Updated on 15 May, 2022 11:23 AM IST

कार्ली व दोडका यांच्‍या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत.महाराष्‍ट्रामध्‍ये कार्ल्‍याखाली अंदाजे 453 हेक्‍टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्‍टर क्षेत्र आहे. कार्ल्‍याला परदेशात व मोठया शहरात तर दोडक्‍याला स्‍थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते.हवामान या दोन्‍ही पिकांची पावसाळी व उन्‍हाळी हंगामात लागवड करतात. कारल्‍यास उष्‍ण व दमट हवामान तर दोडक्‍यास समशितोष्‍ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो. मात्र कार्लाच्‍या वेलीवर थंडीचा परिणाम होतो.जमीनभुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्‍यम जमनीत लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत.पूर्वमशागत व लागवड जमीनीची उभी आडवी नांगरट करून तणांचे व गवतांचे तुकडे वेचून शेत स्‍वच्‍छ करावे.तद नंतर प्रति हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल शेणखत किंवा कंपोस्‍टखत टाकावे. कुळवणी करून खत जमिनीत चांगले मिसळावे.

कार्ल्‍याची लागवडीसाठी दोन ओळीत 1.5 ते 2 मिटर व दोन वेलीत 60 सेमी अंतर ठेवावे.दोडक्‍यासाठी दोन ओळी 2.5 ते 3.5 मिटर वर दोन वेलीत 80 ते 120 सेमी अंतर ठेवतात प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बिया लावतात.दोन्‍ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत.बिया वरंब्‍याच्‍या बगलेत टोकाव्‍यात. उगवण होईपर्यंत पाणी बेताचे द्यावे.हंगाम कार्लाची लागवड उन्‍हाळी पिकासाठी जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करतात.उशिरात उशिरा मार्चमध्‍ये सुध्‍दा लागवड करतात.खरीपाची लागवड जून जूलै महिन्‍यात करतात.दोडका कमी दिवसात येणारा असल्‍यामुळे त्‍याची लागवड कारल्‍यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते वाण अ) कारले कोईमतूर लॉग : या जातीची फळे पांढरी व लांब असतात. या जातीची लागवड महाराष्‍ट्रात पावसाळी हंगामात होते.अरका हरित : या जातीची फळे आकर्षक लहान मध्‍यम भगी फूगीर, हिरवीगार असतात.फळांमध्‍ये बियांचे प्रमाण अल्‍प असते.पुसा दो मोसमी : या जातीचे फळ वजनदार व लांब व हिरवे असते. ही जात दोन्‍ही हंगामात योग्‍य आहे. 55 दिवसांत फळे काढणीस सुरुवात होते.

पुसा विशेष : ही जात उन्‍हाळी हंगामासाठी योग्‍य असून नदी काठच्‍या लागवडीस योग्‍य आहे.य शिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्‍या सिलेक्‍शन-4, सिलेक्‍शन-5, सिलेक्‍शन-6 तसेच कोकण तारा, फुले ग्रिन गोल्‍ड अर्काहरित, हिरकणी या जाती लागवडीस योग्‍य आहे.ब) दोडका पुसा नसदार : या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात. या जातीस 60 दिवसांनी फूले येतात. प्रत्‍येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात.को १ : ही हळवी जात असून फळे 60 ते 75 सेमी लांबीची असतात. प्रत्‍येक वेलीस 4 ते 5 किलो फळे लागतात.या शिवाय पुसा चिकणी कोण हरिता, फुले सूचेता तसेच स्‍थानिक जाती लागवडीयोग्‍य आहेत.बियाण्‍यांचे प्रमाण कारल्‍यासाठी हेक्‍टरी 5 ते 6 किलो बियाणे लागते.बियाणे 25 ते 50 पी.पी.एम.जी.ए. किंवा 40 पी.पी.एम.एन.ए.ए. च्‍या द्रावणात बुडवून नंतर प्रतिकिलो बियाण्‍यास 3 ते 4 ग्रॅम कार्बोन्‍डॅझिम लावून नंतर लागवड करावी.दोडक्‍यासाठी हेक्‍टरी 3 ते 4 किलो ग्रॅम बियाणे लागते.खते व पाणी व्‍यवस्‍थापन कारले पिकासाठभ्‍ प्रति हेक्‍टरी 20 किलो नत्र 30 किलो स्‍फूरद व 30 किलो पालाश लागणीच्‍या वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्‍ता 20 किलो या प्रमाणाम फूले दिसायच्‍या वेळेस द्यावा.तसेच दोडका पिकासाठी प्रति हेक्‍टरी 20 ते 30 किलो नत्र 25 किलो स्‍फूरद व 25 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी द्यावेत.व नत्राचा 25 ते 30 किलोचा दुसरा हप्‍ता 1 महिन्‍याने द्यावा.

आंतरशागत झाडा भोवतालचे तण काढून स्‍वच्‍छता ठेवावी, जमिन नेहमी भुसभुशीत ठेवावी.दोन्‍ही पिकास आधाराची गरज असल्‍यामुळे बांबू अगर झाडांच्‍या वाळलेल्‍या फांद्यांचा वापर करावा.तसेच तारांवर सुध्‍दा वेली पसरवून त्‍यापासून चांगला नफा मिळविता येतो.रोग व कीड रोग : या पिकांवर प्रामुख्‍याने केवडा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. भुरी रोगाच्‍या नियंत्रणासाठी डिनोकॅप -1 मिली. 1 लिटर पाण्‍यातून फवारावे तसेच केवडा या रोगाच्‍या नियंत्रणासाठी डायथेन झेड 78 हेक्‍टरी औषध 10 ग्रॅम 10 लिटर पाण्‍यातून फवारावे.किडी : या पिकांवर प्रामुख्‍याने तांबडे भुंगिरे, फळमाशी व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. पाने खाणारी आळीच्‍या नियंत्रणासाठी ट्रायअॅझोफॉस 2 मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे. फळ माशीच्‍या नियंत्रणासाठी मेलॉथिऑन 2 मिली प्रतिलिटर पाण्‍यातून फवारावे.काढणी व उत्‍पादन लगवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलावर येतो. पुर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत. नखाने हळूच दाबल्‍यावर वर व्रण पडतो. ती फळे कोवळी समजावीत. दोडक्‍याचे हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल उत्‍पादन मिळते.कारल्‍याची फळे कोवळी असतानाच काढावीत.कारल्‍याचे हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल उत्‍पादन 

 

श्री. विनोद धोंगडे

मो. नं. 9923132233 मु.नैनपुर ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर (म.रा)

English Summary: Do it Carly and Dodka planting and management, planning
Published on: 15 May 2022, 11:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)