रब्बी हंगामात शेतकरी चारा व धान्य असा दुहेरी फायदा देणारे ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. संकरीत वाणांची निवड व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास ज्वारीचे जास्त उत्पादन घेणे शक्य आहे. याबाबत जाणून घेऊयात.1.जमिनीची निवड : ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही व वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी Moisture is not retained for long in light soils and less so in sensitive stages of growth ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते.
शेतकरी बांधवांना कमी खर्चात जास्त उत्पादन, शेतकऱ्यांना "मल्टिप्लायर तंत्रज्ञान वरदान"
2. वाणांची निवड : सुधारित आणि संकरीत वाणांची निवड करावी.3 पेरणीची वेळ : रब्बी ज्वारी लागवडीसाठी पेरणीची योग्य वेळ साधणे महत्वाचे आहे. पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या
ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी.4. रासायनिक खतमात्रा : माती परीक्षणानुसार पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांची योग्य मात्रा दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. हलक्या जमिनीमध्ये एकरी 10 किलो नत्र पेरणीचे वेळी द्यावे. मध्यम जमिनीत एकरी 16 किलो नत्र, 8 किलो स्फुरद प्रति एकरी द्यावे. 5. पाणी व्यवस्थापन: ज्वारीच्या संवेदनशील
अवस्थांमध्ये उपलब्धतेनुसार पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पन्नात वाढ होते. कोरडवाहू ज्वारीला, पिक गर्भावस्थेत असताना 28 ते 30 दिवस पाणी द्यावे.6. कीड व रोग नियंत्रण : उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. दाण्यांवरील बुरशी, पानांवरील करपा, तांबेरा, चिकटा नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड (50 डब्ल्यूपी) 3 ग्रॅम किंवा मॅकोझेब (75 डब्ल्यूपी) 3 ग्रॅम फवारावा.
Published on: 07 October 2022, 07:48 IST