Agripedia

मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे.

Updated on 30 October, 2022 6:50 AM IST

मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे. समुद्रातल्या मासळीपेक्षा गोड्या पाण्यातल्या मासळीला चव असते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीकडे आपण वळले पाहिजे.

कुठे करता येतो हा व्यवसाय ?खेड्याखेड्यांत पाझर तलाव, गावतळी भाडेतत्त्वावर घेऊन मत्स्यपालन करू शकतो.Fish farming can be done on lease at the village level.

सुधारित हरभरा लागवड तंत्र वाचा आणि वापर कराच

किंवा वैयक्तिक विहिरी, नदीनाल्याचे डोहं, पात्र, लहान - मोठे जलाशय दगडाच्या खाणी - भातशेती इ. ठिकाणच्या पाण्यात माशांची शास्त्रोक्त पद्धतीनं पैदास करता येते.

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती म्हणजे : उपलब्ध पाणीसाठ्यात योग्य जातीचे मासे योग्य प्रमाणात सोडून त्यांची जलद वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून कमी वेळात जास्त माशाची पैदास करणं याला गोड्या पाण्यातील मत्स्यशेती म्हणतात.

कोणत्या जातीचे मासे वाढवू शकतो ?गोड्या पाण्यात जलद वाढणाऱ्या माशाच्या जाती म्हणजे कटला, राहू, मृगळ, चंदेरा, गवत्या आणि सायप्रिनस या पाण्याचा तळ धरून वाढतात.या जाती एकमेकाला त्रासदायक नाहीत. त्यामुळे या जातींची बोटुकलं एकाच पाणीसाठ्यात वाढवू शकतो.

वाढीचा कालावधी : चांगले व्यवस्थापन ठेवल्यास १२ महिन्यांत १ किलो वजनाचे मासे तयार होतात. १ किलोचे मासे पकडून विक्रीसाठी पाठवावेत. साधारणतः ५ एकर पाणीसाठ्यात वर्षाकाठी ३००० किलो अगर त्याहूनही जास्त मासे मिळू शकतात. दरभाव चांगला असल्याने पैसेही चांगले मिळतात.

English Summary: Do fish farming in this water, there will be progress towards economic development
Published on: 28 October 2022, 08:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)