Agripedia

कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Updated on 10 January, 2022 2:16 PM IST

कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

 या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.

काळी माशी पानाच्या मागच्या बाजूने एकावेळी २५० पर्यंत अंडी घालते.

 सुमारे १० दिवसात अंडी उबून त्यातून छोट्या अळ्या बाहेर पडतात.

पानाच्या दोन पापुद्र्या मध्ये शिरून ही अळी एक प्रकारे भुयार तयार करते.

ही अळी पानातील टिश्यू खात - खात पुढे सरकत जाते, तो प्रवास म्हणजे नागमोडी पट्टे असतात.

 दोन - तीन आठवड्यात अळीची पूर्ण वाढ झाली की ती पानाच्या बाहेर पडून जमिनीवर येते व दोन - तीन इंच मातीत खोल जाऊन तिचे कोषात रुपांतर होते.

१५ दिवसांनी त्या कोषातून काळी माशी बाहेर पडते.

 या किडीने भाजीपाला पिकाचा दर्जा बिघडतो.

 किडीच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया कमी पडते, त्यामुळे उत्पादन घटते.

 हिवाळ्यात ही कीड सुप्तावस्थेत राहते आणि तापमान वाढू लागताच तिचा प्रादुर्भाव सुरु होतो.

 पानाच्या आत या अळीचे वास्तव्य असल्याने कीटकनाशकाच्या फवारणीचा फारसा उपयोग होत नाही.

नियंत्रण :-

१. बॅसिलस थुरिनजीनसिस :- सोयाबीन पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

२. कार्बोफुरॉन ३% सि.जी. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून देणे.

३. सायान्ट्रानिलीप्रोल १०.२६% ओडी :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घेणे.

४. डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी., लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी., क्विनालफॉस २५% ई.सी. :- भुईमूग पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

५. इमिडाक्लोप्रीड १७.८% एस.एल. :- लिंबूवर्गीय पिकांवरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी.

६. क्लोरानट्रानिप्रोल ८.८ + थायोमिथोझाम १७.५ एस.सी. :- टोमॅटो पिकावरील नाग अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीतून आळवणी करणे.

English Summary: Do aslo management nagali
Published on: 10 January 2022, 02:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)