Agripedia

मागील वर्षी सोयाबिन बियाणा बद्दल खुप समस्या आल्या आहेत.

Updated on 07 April, 2022 1:44 PM IST

मागील वर्षी सोयाबिन बियाणा बद्दल खुप समस्या आल्या आहेत. त्या समस्या टाळण्यासाठी स्वताच्या शेतात बियाणे निवडावीत आपल्या शेतातील सोयाबिन ची शेंगा कशी भरल्यात किंवा रोगट आहे का चांगल्या प्रकारे सोयाबिन शेंगाची वाढ होत आहे का पाहावे चांगली वाढ सुध्दा पाहावी खालील माहिती नुसार.बियाण्याची गुणवत्ती म्हणजे काय?

अधिक उत्पादनासाठी नेहमी दर्जेदार व गुणवत्ता असलेले बियाणे वापरावे असे म्हटले जाते किंवा सांगितले जाते. गुणवत्ता म्हणजे नेमके काय? गुणवत्ता ठरवण्याचे निकष कोणते? ते कसे ठरवले जातात? त्यांचे प्राधान्यक्रम म्हणजे अत्यंत महत्त्वाचे, कमी महत्त्वाचे असे कोणते गुणधर्म आहेत, ते कसे ठरविले जातात, याची माहिती खाली दिली आहे.

आनुवंशिक क्षमता

बियाण्याची गुणवत्ता तीन टप्प्यात पाहिली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये आनुवंशिक क्षमता हा सर्वात पहिला व अधिक उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. कोणत्याही पिकाचे वाण निर्माण करण्यास सर्वसाधारणपणे 7 ते 10 वर्षे लागतात. या कालावधीमध्ये संबंधित पैदासकाराने त्याच्या विविध चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामध्ये प्रति हेक्टरी उत्पादन हे अग्रक्रमाने पाहिजे जाते व वाण प्रसारित करण्याअगोदर कोणत्याही पीक वाणाची उत्पादकता ही त्याच्या आनुवंशिक क्षमतेवर अवलंबून असते. ती बियाण्यामार्फत दिसून येते म्हणून आनुवंशिकदृष्ट्या अधिक क्षमता असलेल्या वाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले दर्जेदार बियाणे वापरणे अधिक उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. उत्पादन क्षमता बियाण्यामार्फत पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होते. म्हणून पीक उत्पादनामध्ये उत्तम आनुवंशिक क्षमता असणार्‍या वाणांचे दर्जेदार बियाणे वापरणे महत्त्वाचे आहे.

1. आनुवंशिक शुद्धता:

दुसर्‍या टप्प्यामध्ये अनुक्रमे आनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुध्दता व बियाणाचा जोम हे गुणधर्म महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादे वाण शेतकर्‍यांना उत्पादनासाठी प्रसारित केले जाते, तेव्हा त्या वाणात विशेष असे गुणधर्म असतात. ज्यावरून त्या वाणाची ओळख पटवता येऊ शकते. अशा गुणधर्मावरूनच त्याची शुद्धता पडताळण्यास मदत होते. कोणत्याही वाणाचे बीजोत्पादन केल्यानंतर त्याचे संपूर्ण गुणधर्म बियाण्यामध्ये दिसून आले पाहिजेत. त्यामध्ये वेगळी किंवा भेसळीची झाडे असल्यास ते बियाणे आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध राहत नाही. यामध्ये मुलभूत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता 100 टक्के असणे अनिवार्य आहे व त्याची चाचणी प्रक्षेत्रावर संबंधित पैदासकार किंवा बियाणे उत्पादकाने करुन घेणे बंधनकारक असते. पायाभूत बीजोत्पादनाची अशा प्रकारची चाचणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत घेतली जाते.

2. उगवण क्षमता:-

बियाण्यामधील बीजांकुराचे (बीज उगवण ) पोषक वातावरणात परिपूर्ण रोपामध्ये रुपांतरित होण्याच्या शक्तीस उगवण क्षमता म्हणतात. बियाण्याची उगवण क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे. पीकनिहाय बियाण्याची न्यूनतम प्रमाणकानुसार उदाहरणार्थ, सोयाबीन, हरभरा ,भुईमूग, कांदा बियाण्याची उगवण क्षमता कमीत कमी 70 टक्के तर ज्वारी, गहू या बियाण्याची कमीत कमी उगवण क्षमता 85 टक्के असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास बियाणे विक्रीस परवानगी दिली जात नाही. सदरची चाचणी घ्यावी.

3. भौतिक शुद्धता:-

बियाण्याची भौतिक शुद्धता म्हणजे त्यामध्ये असणार्‍या इतर घटकांचे- उदाहरणार्थ, त्यातील काडीकचरा, दुसर्‍या जातीचे अथवा पिकाचे बियाणे, तण बियाणे, फुटके बियाणे यांचे प्रमाण पाहिले जाते. ते जर प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त असेल, तर ते बियाणे भौतिकदृष्ट्या शुद्ध नाही, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे त्या बियाम्याचे बाह्य गुणधर्मही शुद्धता पाहताना तपासले जातात. बियाण्याची शुद्धता पाहताना तपासले जातात. बियाण्याची टिकवण्यासाठी प्रक्रिया करताना फुटलेले किंवा कीड लागलेले बियाणे, प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यात बाजूला काढणे आवश्यक असते. तसेच बियाणे साठवणुकीच्या वेळी त्यांचे कीड आणि रोग यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजणे आवश्यक आहे. तरच बियाण्याची भौतिक शुध्दता टिकवण्यास मदत होते. याची वजनावरून घेतली जाते. त्यामध्ये बियाण्याचा नमुना घेऊन त्याचे वजन केले जाते. त्यानंतर बियाणे नमुना पूर्ण स्वच्छ करून बियाण्याव्यतिरिक्त निघालेल्या इतर घटकांचे वजन केले जाते व त्याचे गुणोत्तर काढून बियाण्याची भौतिक शुद्धता काढली जाते. सर्वसाधारणपणे बियाणे 98 टक्के भौतिक शुद्ध असणे बंधनकारक असते.

4. बियाण्याचा जोम:-

बियाणे जोमदार असणे महत्त्वाचे असते कारण पेरणी केल्यानंतर जमिनीत जर काही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याची उगवण व्हावी इतका जोम बियाण्यात असावा लागतो. बियाण्याची उगवण क्षमता (%) व रोपाचे शुष्क वजन किंवा लांबी यांचा गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे बियाण्याचा जोम होय. ज्या बियाण्याची ही संख्या जास्तीत जास्त येईल, त्याचा जोम जास्त आहे असे समजावे.

1. बियाण्यांचे आरोग्य

तिसर्‍या टप्प्यामध्ये अनुक्रमे बियाण्यांचे आरोग्य, त्यातील ओलावा, आकार, रंग हे गुणधम महत्त्वाचे आहेत. बियाणे हे रोग व किडीपासून मुक्त असणे महत्त्वाचे असते. नाहीतर बियाण्यामार्फत विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बियाणे रोग किंवा कीडग्रस्त असल्यास ते साठवणुकीतही खराब होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारच्या बुरशी, जिवाणू, किडी वातावरणात असतात किंवा बियाण्यात सुप्त अवस्थेत लपलेल्या असतात. त्यामुळे बियाणे साठवणुकीत किंवा त्यानंतर शेतात हे जिवाणू आणि किडी कार्यरत होऊन बियाण्यांचा किंवा त्या पिकाचा नाश करतात. बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा किडींचा आणि जिवाणूंचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. याचीही चाचणी प्रयोगशाळेत घेतली जाते.

2. बियाण्यातील ओलावा:-

बियाण्यातील ओलावा हा साठवणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी ओलाव्याचे प्रमाण ठरावीक पातळीपर्यंत कमी करावे लागते. काढणीच्या वेळेस बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. ते वाळवून 10 ते 20 टक्के पर्यंत खाली आणावे लागते तरच बियाण्याचा जोम आणि उगवण क्षमता टिकून राहते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे बीजोत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरावर काढणी, मळणी प्रक्रिया, साठवणीत बियाण्यातील ओलावा सुरक्षित पातळीवर आणला जातो. वाळवणीच्या योग्य पद्धतीचा वापर करणे त्यासाठी महत्त्वाचे असते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण प त्याचा उपयोग बीजोत्पादकांनी केल्यास साठवणुकीत बियाणे जास्त काळ रोग व कीडरहित ठेवता येईल.

3. बियाण्याचा आकार:-

बियाणे हे एकसारखे असावे. बियाणे प्रक्रिया केल्यामुळे मोठे व बारीक बियाणे वेगळे केले जाते.

4. बियाण्याचा रंग:-

बियाण्याचा रंग त्याच्या मूळ रुपासारखाच असणे महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा बियाणे पावसात भिजले किंवा साठवणुकीत ओलावा जास्त राहिला तर बियाण्याच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. अशा बियाण्याची उगवण क्षमता कमी असते..

बियाणाची काळजी काय घ्यावी:- जेव्हा सोयाबिन बियाणे कापनी करणार आहोत तेव्हा शेंगावर करपा नसावा , रोगीट नसाव्यात , दाणा फार वाळून त्याच्यातील तेलाचे प्रमाण कमी होवू नये , शेगा पिवळसर झाल्या नंतर पाला गळ झाल्या नंतर सोयाबिन कापनी करावी जास्त वाळलेल्या शेंगा बियाणासाठीवापर करू नये.. सोयाबिन कापनी झाल्यावर ताडपञी खाली ठेवू नये त्यामुळे बुरशी तयार होते व उगवणी वर परिणाम होतो.

पेरणीसाठी बियाणे साठवून ठेवताना:-

सोयाबिनचे बियाणे अत्यंत नाजुक असते. त्याचे बाह्य आवरण पातळ असते. बियाण्यातील बिजांकुर व मलांकुर बाह्य आवरणाच्या लगत असल्यामुळे बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी. बियाण्याची जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी बियाणे साठवून ठेवताना बियाणे पिशव्यांची जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही. त्याची कमीत कमी हाताळणी होईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे

English Summary: Do also soybean seed selection and preparation
Published on: 07 April 2022, 01:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)