हळदीचे कंद काढताना पूर्ण कालावधी झालेले परिपक्व (साधारण नऊ महिने पूर्ण झालेले) कंद काढावेत.
कंद काढतेवेळी ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो, तो साठवणुकीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणक्षमतेवर परिणाम होतो. हळद काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठीचे कंद लगेच किंवा शक्य तेवढ्या लवकर सावलीत ठेवावेत. बेणे प्लॉट घ्यावयाचा असल्यास, हळकुंड बेणे वापरावे.
व्यापारी दृष्टिकोनातून लागवडीसाठी मातृकंद किंवा बंडा वापरावा. बेणे साठवणुकीसाठी हळदीचा पाला/ पाचट/ गव्हाचे काड/ वाळलेले गवत यांचा वापर करावा.
वापरापूर्वी हे सर्व घटक क्विनॉलफॉस २ मि.लि. अधिक कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावेत.निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत.बेणे सावलीमध्ये हवेशीर ठिकाणी साठवावे.
बंद खोलीत, हवा खेळती राहत नाही, अशा ठिकाणी बेणे साठवू नये. बेण्याच्या मुळ्या काढू नयेत. मुळ्या काढल्यामुळे कंदास इजा होऊन साठवणुकीत कंद सडतात. बेणे साठवताना त्याच्यावर कार्बेंडाझिम १ किलो प्रतिटन बेणे या प्रमाणात धुरळावे.
बेणे बुरशीनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवू नये.
बेण्याचा ३ फूट उंच व जरुरीप्रमाणे लांबीचा ढीग करावा. बेण्याचा ढीग ३ फुटांपेक्षा जास्त उंचीचा केल्यास, उष्णता निर्माण होऊन कंद खराब होतात. पाऊस आल्यास बेणे झाकावे.
आणि हो, साठवणुकीसाठी हळदीचा पाला/ पाचट/ गव्हाचे काड/ वाळलेले गवत यांचा वापर करावा. वापरापूर्वी हे सर्व घटक क्विनॉलफॉस २ मि.लि. अधिक कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावेत. निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत.बेणे सावलीमध्ये हवेशीर ठिकाणी साठवावे.
बंद खोलीत, हवा खेळती राहत नाही, अशा ठिकाणी बेणे साठवू नये. या गोष्टीकडे काळजीने लक्ष द्यावे.
शेतकरी हितार्थ
Published on: 25 April 2022, 10:17 IST