Agripedia

पपईसाठी उत्तम निचरा होणारी मध्यम काळी पोयट्याची जमीन योग्य असते. भारी जमीनीत उंच बेड वर लागवड करुन पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी. जांभ्या खडकाच्या जमिनीत पपईची झाडे चांगली वाढतात.

Updated on 10 January, 2022 6:00 PM IST

पपईसाठी उत्तम निचरा होणारी मध्यम काळी पोयट्याची जमीन योग्य असते.

 भारी जमीनीत उंच बेड वर लागवड करुन पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी. जांभ्या खडकाच्या जमिनीत पपईची झाडे चांगली वाढतात.चुनखडी व खळकाळ जमिनीत झाडे चांगली वाढत नाहीत.पपईझाड उष्ण कटीबंधात वाढणारे आहे.पिकास सरासरी कमीतकमी १५-३० अंश व जास्तीत जास्त ४४ अंश से. ग्रे. तापमान लागते. कडाक्याची थंडी व जोरदार वारे नकोत. वाऱ्यापासुन संरक्षण साठी बांधाला वनभिंत असावी, चारही बाजुने मका पेरावा, फुले संपुर्णा सारखे उंच वाढणारे चारा पिक बांधावर लावावे.

 जाती :-

नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडावर येणाऱ्या जाती पुसा जायंट , पुसा नन्हा , वाशिंग्टन , को-१, को-२, को-३, को-४, को-५ ,को-६ पुसा ड्राफया आहेत.तर उभयलिंगी कुर्ग हनीड्यु, को-७ पुसा डेलिसियस, सनराईज सोलो, अर्का प्रभात या उभयलिंगी आहेत तसेच तैवान ७८६ ही जात मार्केटला जास्त चालते.नर मादी फुले येणाऱ्या जातीची एका ठिकाणी दोन रोपे लावावीत, फुले सुरु झाल्यावर नर मादी कळते तेव्हा संपूर्ण शेतात १०%नर झाडे राहु द्यावीत बाकी नर झाडे काढावीत. परागिकरणासाठी मधमाश्या आकर्षित होणे साठी सुर्यफुल झेंडु चवळी बागेत लावावी व गुळाचे पाणी फवारणी करावी. फुलगळ दिसल्यास सकाळी एक तासभर नर फुले घेवुन मादीफुलावर हाताने परागिकरण करावे.

उभरलिंगी एकाच झाडावर नरमादी फुले येणारी पपईरोप फुलिवर एक एकच लावावे. बागेत मधमाश्या मुंगळया व किटक असल्यास परागिकरण होऊन फलधारणा होते फुलगळ होत नाही.

सुधारीत जाती -

१)वाशिंग्टन - या जातीची फळे गोलाकार व लांबोळी असतात.

१ किलो वजनाची फळे येतात. या जातीमधे नर व मादी झाडे वेगवेगळी असतात.

२)को - १ - हि झाडे ठेणगी असतात, मध्यम आकाराची लंब वर्तुळाकार फळे येतात. यात नर मादी झाडे वेगवेगळी असतात

३)को -२ - हिची फळे लांबोळी मोठी साल पिवळसर हिरवी नारंगी गर असलेली असतात.

४)कुर्ग हनीड्यु - ही जातीची निवड पध्दति ने तयार केली आहे. ह्या जातीला "मधुबिंदु" देखिल म्हणतात या जातीच्या एका झाडावर मादीफुले व द्विलिंगी फुले असतात. त्यामुळे वेगळ्या नर फुलाची गरज नसते झाडावर फळे खाली पासुन लागलेली असतात.कूर्ग मधील चेथाली येथील संत्रा संशोधन केंद्रामधे हनीड्यु जातीच्या झाडापासुन निवड पध्दति ने तयार केली आहे.या जाती ची फळे लांबोळी असुन स्वादिष्ट असतात गर जाड म ऊ नारंगी मध्यम रसदार असतो ठेंगणी झाडे असतात.

५)तैवान ७८६.- ही ठेंगणी जात असुन लंबगोलाकार फळे आकर्षक नारंगी गुलाबी रंगाची मोठी फळे असतात.

रोप तयार करणे 

एकरी २०-३० ग्रम बियाणे लागते. पिशवीत माती व घनजिवामृत मिक्स करुन भरावी व एक बी टोकुन झारीने पाणी देवुन रोप तयार करावीत.मीनी स्प्रिंकलर वापरु शकता. एक दिड महीन्याची रोपे लावणीसाठी तयार होतात.

लागवडीचा हंगाम 

जुन - जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर,, जाने - फेब्रुवारीत करतात होळी पोर्णिमे पर्यंत लागवड करावी पुढे उष्मा वाढला म्हणजे रोपांना सावली करावी लागवड सर्वसाधारण ६×६ वर लागवड करतात. भारी जमीनीवर ८×७ किंवा ८×८वर लागवड करावी.लागवडी आधी जमीनीत घनजिवामृत एकरी ४०० किलो टाकावे. व लागवडीनंतर दर २ ३महीन्याने पण टाकावे. तसेच महीन्यातुन दोन वेळेस जिवामृत पण द्यावे

पपईत सहजीवन पपईत तुरीचे सहजीवन अतीशय उत्कृष्ट आहे, दोन झाडाच्यामधे मध्यम उंचीची तुर व चवळी मठ उडीद टोकावा. 

मधमाश्या साठी झेंडु, सुर्यफुल, गाजर,मका या पिकाचा समावेश करावा. रसशोषक किडी साठी सापळा पिक सहजीवी पिक लावणे आवश्यक. येलो व्हायरस येवु नये म्हणुन पाणी साचू देवु नये व जिवामृत महीन्यातुन दोन वेळेस देणे व फवारणी करणे.रसशोषक किडीचे नियंत्रणासाठी निमास्र दशपर्णि निंबतेल ,करंजतेल यांच्या फवारणी करावी. संपुर्ण नैसर्गिक पध्दति ने सहजीवी पिके पेरल्यास नैसर्गिक नियंत्रण होते.पपई ५ महीन्याची झाली कि फ्लावरींग सुरु झाल्यावर जिवामृत ताका ची फवारणी करावी, व जमीनीवर ड्रिचींग करावी. फळपोषन कालात पण ह्या फवारण्या कराव्यात.

ठिबक असल्यास झाडे जशी वाढतील तशी दुपारी१२ वाजता जेथे सावली पडते तेथे पाणी पडेल अशी नळी टाकावी.

 

 

नैसर्गिक विषमुक्त शेती,महाराष्ट्र

गजानन खडके,9422657574

English Summary: Do also plantation of papaya
Published on: 10 January 2022, 06:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)