Agripedia

मेथी ही राज्यातील प्रमुख शेंगा वर्गीय भाजीपाला पिक असून मेथीचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

Updated on 14 February, 2022 6:15 PM IST

मेथी ही राज्यातील प्रमुख शेंगा वर्गीय भाजीपाला पिक असून मेथीचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीचे पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. काही शेतकरी जवळजवळ वर्षभर मेथीचे पिक घेतात. मेथीमध्ये जीवनसत्व अ, ब, आणि क, कॅल्शिअम, कॅरोटीन, लोह व प्रथिने असल्याने आरोग्यासाठी चांगले असते. मेथी ही पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते, तसेच मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो.

हवामान

मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते. मेथी हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. उष्ण हवामानात मेथी या पिकाची वाढ कमी होतो व त्यामुळे भाजीला चांगला दर्जा मिळत नाही. कसुरी मेथी ही थंड हवामान मानवते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये या पिकाची लागवड करावी त्यामुळे मेथी कमी दिवसात तयार होऊन भाजीला चांगला दर्जा मिळतो.

जमीन

मेथी लागवडीसाठी लागणारी जमीन ही मध्यम ते कसदार व पाण्याचा चांगल्या पध्दतीने निचरा होणारी जमीन असावी.

मेथीच्या प्रमुख जाती

कस्तुरी – या जातीची मेथीची वाढ सुरुवातीला सावकाश होते. या मेथीचे रोपे लहान झुडूपासारखे असतात. या मेथीची पाने लहान व गोलसर असतात. कस्तुरी मेथी ही सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कस्तुरी या जातीची मेथी दोन महिन्यात तयार होते.

पुसा अर्ली बंचिंग – या जातीची मेथीची वाढ लवकर होते. या मेथीची पाने लांबगोल आणि मोठी असतात. या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. स्थानिक ठिकाणी याच जातीचा लागवडीसाठी उपयोग केला जातो. या मेथीचा कोवळेपणा जास्तीत जास्त काळ टिकून राहतो.

मेथी नं. ४७ – ही मेथी ब-याच स्थानिक ठिकाणी या मेथीची लागवड केली जाते. या मेथीला लवकर फुल येत नाही व त्यातच कोवळेपणा जास्त टिकून राहतो.

लागवड पद्धती :

मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये 20-25 सेंमी. अंतरावर ओळीतून पेरुन किंवा बी फेकून करतात. आंतरपीक म्हणून मेथीचे पीक घेताना मुख्य पिकामधील मोकळ्या जागेत मेथीचे बी 20-2 सेंमी. अंतरावर पेरावे. मेथीच्या लागवडीसाठी 3 2 मीटर आकाराचे किंवा त्यापेक्षा अधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किंवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुरपणी आणि तण काढणे सोपे होते. तसेच कापणी करणे सोपे जाते. नेहमीची मेथी पेरणीनंतरे 3-4 दिवसाते उगवते तर कसुरी मेथीची उगवण होण्यास 6-7 दिवस लागतात. 

साध्या किंवा नेहमीच्यो मेथीच्या एक हेक्टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते. आंतरपीक म्हणून घेताना बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठेवावे. बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच बियांसाठी बीजप्रक्रिया करताना कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलो बियाणेे या प्रमाणात बियास चोळावे.

 खत व पाणी निजोजन

बियाणे टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४५ ते ५० किलो करावा. शक्यतो रासायनिक खताचा वापर करू नये. कोवळी व लुसलुशीत भाजी मिळवण्यासाठी ४ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पाण्याचा नियमित पुरवठा केल्याने अधिक उत्पादन मिळवता येते.

किड व रोग नियंत्रण

मेथीवर रोग व किडीचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही. पंरतु काही वेळा मर या रोगाचा प्रभाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिक घेताना जमिनीची फेरपालट करावी. बियाणे दाट पेरणी करु नये. पानावर ठिपके, केवडा यासारख्या रोगाच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास ३ ग्रॅम मेटॅलॅक्झिल ३५% प्रतिकिलो या प्रमाणात बीचप्रकिया करावी. भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात एकत्र करून फवारणी करावी.

मेथी काढणी

मेथी ही भाजी पेरल्यापासुन ३५ ते ४० दिवसात काढणीला तयार होते. मेथीची काढणी करत असताना रोपटे मुळापासुन उपटून काढतात. मेथीची पाने फुले येण्याअगोदरच काढणी करावी. मेथी काढणी दोन ते तीन दिवसाअगोदर पाणी दिल्यास भाजी काढणी सोपे जाते. काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून जाळीदार कपड्यात व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन

कस्तुरी मेथीचे हेक्टरी ६०० ते ७०० रुपये किलो इतके बियाणे मिळते. आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी ही जास्त असते.

English Summary: Do also benifitial methi plantation
Published on: 14 February 2022, 06:15 IST