Agripedia

खडकाचा प्रकार, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते

Updated on 24 October, 2022 3:46 PM IST

खडकाचा प्रकार, निचऱ्याचा अभाव, पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग, रासायनिक खते व कीडनाशके यांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पाणी क्षारयुक्त होते. त्यामुळे जमिनीतील पाणी सिंचनासाठी वापरताना पाणी परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.पाणीतपासणीसाठी पाण्याचा नमुना घेताना तो योग्य पद्धतीने घेणे हेही महत्त्वाचे आहे. अन्यथा

निरीक्षणे चुकून त्याप्रमाणे उपाययोजनाही चुकण्याची शक्यता असते.As observations go wrong, measures are likely to go wrong. त्यासाठी पाण्याचा नमुना घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा

शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी केलेलं अनुभव कथन, लेअर पोल्ट्रीधारकांसाठी कानमंत्र

 पाण्याचा नमुना गोळा करण्याची पद्धत - पाण्याचा नमुना हा प्रतिनिधिक स्वरुपाचा असावा. सर्वसाधारणपणे सूर्योदयाच्या सुमारास पाण्याचा नमुना घ्यावा. त्यानंतर २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. अनुमान जास्त अचूक येण्यासाठी त्याची मदत होते.

- पाण्याचा नमुना घेण्यापूर्वी आदल्या दिवशी विहिरीच्या पाण्याचा उपसा होणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी बादलीने विहिरीतील पाणी ढवळावे व नंतर बादली साधारणपणे शक्यतो विहिरीच्या मध्यभागी व पाण्याच्या उंचीच्या निम्म्या खोलीपर्यंत सोडून वर काढून घ्यावी.- एक लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेल्या दोन

स्वच्छ धुतलेल्या प्लॅस्टिक बाटल्या घ्याव्यात. ज्या पाण्याचा नमुना घ्यावयाचा आहे, त्याच पाण्याने बाटल्या दोन तीन वेळा विसळून घ्याव्यात. नंतर त्या बाटल्यांमध्ये पाणी भरावे. बाटल्या टोपण लावून बंद कराव्यात.- प्रत्येक बाटलीवर एक छोटेसे लेबल लावावे व त्या लेबलवर शेतीचा सर्वे नंबर, विहिरीचे नाव, विहिरीतील पाण्याची पातळी आणि नमुना घेतल्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे.

 

डाँ.सचिन तेलंगे पाटील 

English Summary: Do a water test before irrigation
Published on: 23 October 2022, 04:23 IST