Agripedia

पीक वाढीसाठी जस्ताचे महत्व व त्याच्यावेळेस जमिनीमध्ये व पिकांमध्ये जस्त कमतरते चे गांभीर्य लक्षात घेता

Updated on 14 July, 2022 5:28 PM IST

पीक वाढीसाठी जस्ताचे महत्व व त्याच्यावेळेस जमिनीमध्ये व पिकांमध्ये जस्त कमतरते चे गांभीर्य लक्षात घेता , उपलब्ध माहिती वेळेवर व व्यवस्थित मुल्यांकनामुळे जस्ताची कमतरता, त्याच बरोबरीचे उपाय, जस्त खतांचा परिपूर्ण वापर इ. चांगले पीक उत्पादन घेण्याकरिता आवश्यक आहे. जस्त वेगवेगळ्या वनस्पतींच्या चयापचय प्रकिया, पेशी भित्तिकांचा विकास, श्वसन, प्रकाशसंस्लेशन क्रिया, हरितद्रव्य तयार करणे , विविध विकर व इतर जीवरसायन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचे कार्य करतो. रासायनिक खताचा संतुलित व कार्यक्षम वापराकरिता मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील असलेल्या घोटा या गावात आदिवासी शेतकरी बांधवांना खताच्या संतुलित मात्रेचा उपयोग करण्याकरता मार्गदर्शन व खत वाटप करण्यात आले.

आदिवासी भागात शेतकऱ्यांमध्ये असलेली खत वापराची उदासीनता तसेच असलेले अज्ञान या बाबींचा विचार करून आदिवासी बांधवांना मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच दुय्यम व सूक्ष्म अन्नदाव्यांची माहिती पटवून या खताच्या वापरामुळे मका पिकांचे उत्पादनच वाढणार नाही तर जमिनीची सुपीकता पण टिकून राहील याबद्दल समजावून सांगण्यात आले. अंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान महासंघ या वर्षी जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने रासायनिक खताचा संतुलित व कार्यक्षम वापर म्हंणून साजरे करत आहे. दिनांक 06 जुलै 2022 रोजी धारणी तालुक्यातील असलेल्या घोटा गावातिल आदिवासी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन संतुलित खताचा वापर व कार्यक्षमता याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सूक्ष्म व दुय्यम प्रकल्प अंतर्गत घोटा येथील निवडक आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक आधारे मका पिकाकरिता झिंक सुल्फेट या खताचे वाटप करण्यात आले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून तसेच संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनातून व विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांच्या पुढाकाराने सदर प्रथम रेषीय प्रात्यक्षिक आदिवासी शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात आले. आदिवासी शेतकरी बांधवाना झिंक सुल्फेट या खताचे वाटप केले. मातीचे नमुने गोळा करून व त्यांना सोळा अन्नद्रव्ये परीक्षण असलेली मृदा पत्रिका देण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता प्रकल्प प्रमुख डॉ. संदीप हाडोळे, कनिष्ठ मृदा शास्त्रज्ञ श्री. प्रशांत सरप, संशोधन संयोगी डॉ. अक्षय इंगोले, कृषी सहायक श्रेयस नांदुरकर तसेच कुशल मदतनीस अमोल पाटील यांनी सहभाग नोंदवला.

चांगले पीक उत्पादन घेण्याकरिता आवश्यक आहे. जस्त वेगवेगळ्या वनस्पतींच्या चयापचय प्रकिया, पेशी भित्तिकांचा विकास, श्वसन, प्रकाशसंस्लेशन क्रिया, हरितद्रव्य तयार करणे , विविध विकर व इतर जीवरसायन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचे कार्य करतो. रासायनिक खताचा संतुलित व कार्यक्षम वापराकरिता मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील असलेल्या घोटा या गावात आदिवासी शेतकरी बांधवांना खताच्या संतुलित मात्रेचा उपयोग करण्याकरता मार्गदर्शन व खत वाटप करण्यात आले.

English Summary: Distribution of Zinc Sulphate fertilizer to tribal farmers for increasing the yield of Maize crop
Published on: 14 July 2022, 05:28 IST