उसावर बियाण्याद्वारे काणी,गवताळ वाढ, खोड-कुजव्या, पोगा फुटणे,मोझॅक वाढ खुंटणे, इत्यादी रोग येतात तर हवेद्वारे पसरणारे रोग म्हणजे पोक्का योग, तांबेरा पानावरचे ठिबके आणि जमिनिद्वारे पसरणारे रोग म्हणजे अननस ( पाईनेंपल) कांडी-कुज, मुळकुज आणि मर
1)उसावरची काणी चाबूक काजळी हा रोग सर्वांना परिचित आहे अशी चाबूक काणी प्लास्टिकच्या पोत्यात काढून घेवून ते सर्व बेत मुळासह उपटून जाळून टाकावे, बेण्यास उष्णजल प्रक्रिया करावी तसंच १०० ग्रॅम कार्बेन्डटिम + १०० लिटर पाण्यात कांडीप्रक्रिया करावी
रोगप्रतिकारक ६७१, ८६०३२, ९४०१२ या जाती लावाव्यात.
2.गवताळ वाढ हाही रोग परिचित आहे. ऊस बेट मुळासकट उपटून जाळून टाकावे, रोगमुक्त बेण लावावे. उष्मजल प्रक्रिया करावी रसशोषणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा.
3)ऊसावरचा तांबेरा हा बुरशीजन्य रोग आहे. संपूर्ण पान तांबेरायुक्त होते. ८६०३२ सारखी प्रतिकारक जात लावावी. रोगग्रस्त वाळलेली पान काढून जाळून टाकावीत.
उसाला लहानपणी पाण्याचा तान पडू देऊ नये.पाण्याची दलदल होऊ देऊ नये तांबेन्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५. ३ ग्रॅम १ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारावे.
4)ऊसावराचा पोक्का बोंइंग हवेतल्या बुरशीमुळे होतो आर्द्रता आणि कमी तापमानात याचा प्रादुर्भाव वाढतो. पान कुजल्याने, गुरफटल्याने कांड्यांचे पोषण न होता वेड्यावाकड्या आणि आखूड होतात.शेंडेकुज पांगशा फुटलेले ऊस काढून टाकावेत २ लिटर पाणी याचं मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारावे. कॉपर ऑक्झिक्लोराईड 2 ग्राम/लिटर पपांनी यांचे मिश्रण १० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा फवारावे.दलदल होऊ देवू नये. खतमात्रा योग्यवेळी याव्यात.
5)उसावर मर या रोगाचा प्रादुर्भाव होतो बियाणे निरोगी असावे निचऱ्याची जमीन असावी कार्बेन्डझिम बेनेप्रक्रिया करावी.
6)ऊसावरचा केवडा विशेषतः खोडव्यात केवडा दिसतो. १० किलो फेरस सल्फेट शेणखतातून जमिनीत द्यावे.
एकरी ५०० ग्रॅम फेरस सल्फेट ५०० ग्रॅम झिंक सल्फेट २५ किलो युरिया १०० लिटर पाणी या मिश्रणाच्या २-३ फवारण्या १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.
ट्रायकोडर्माचा अवश्य वापर करावा
पिकाची फेरपालट करावी.
खोडव्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.
स्रोत:-विकासपीडिया
-Team - IPM school
Published on: 23 October 2021, 07:56 IST