खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले होते. शेतकऱ्यांनी आपले सोन्यासारखे पीक आपल्या डोळ्यसमोर राख होताना पहिले, खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना अतिवृष्टीचा खुप मोठा फटका बसला आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट घडून आली. खरीप हंगामातील फक्त कापुस आणि तूर हे दोनच पीक सहिसलामत राहिलेले आहे, आणि ते देखील आता अंतिम टप्प्यात आहे.
खरीप हंगामातील सर्व पिकांची जवळपास काढणी झाली आहे, पण अतिवृष्टीमुळे हे पीक पाहिजे तेवढे उत्पादन देऊ शकले नाही. म्हणुन शेतकऱ्यांची आता खरीप हंगामातील ह्या दोन पिकावर नजर आहे आणि यातून चांगली कमाई होण्याची आशा आहे. पण अंतिम टप्प्यात असलेल्या कपाशी आणि तूर पिकाला देखील आता बदलत्या वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे. मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण बदलले आणि त्यामुळे कपाशी पिकावर लाल्या रोग तर तुर पिकावर मररोग वाढत आहे. त्यामुळे खरीप हंगामातून जर शेतकरी राजांना थोडीफार कमाई पदरात पाडून घ्यायची असेल तर ह्या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवावे लागेल. म्हणुन आज आपण ह्या रोगावर कसे नियंत्रण मिळवता येईल याविषयी जाणुन घेणार आहोत.
तुरीवरलं मर रोग आणि त्यावर नियंत्रण
शेतकरी मित्रांनो अनेक पिकांवर मररोग हल्ला करत असतो, आणि अंतिम टप्प्यात असलेल्या तूर पीक देखील वाचू शकले नाही. मररोग हा बुरशीचा परिणाम असतो.
आणि यामुळे उत्पादनात मोठी घट घडून येते. या रोगामुळे तूर पिकाच्या खोडावर ठिपके पडतात, भेगा पडतात, त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते परिणामी अन्नपूरवठा मुळाना होत नाही आणि तूर पीक हे खालूनच सुकायला सुरवात होते. अलीकडे अंतिम टप्प्यात तूर पीक आले की, हा रोग आलाच असेच समजायचे. यामुळे पिकाला लागलेली संपूर्ण मेहनत वाया जाते शिवाय उत्पादन घटते त्यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तूर उत्पादका शेतकऱ्यांनी फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर पिकाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे कंबाईन बुरशीनाशक 1:1 ह्या प्रमाणात घेऊन फवारावे. तसेच फवारणी हि वातावरण स्वच्छ असताना करावी म्हणजे यापासून चांगला रिजल्ट मिळेल.
कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाचे असे करा नियंत्रण
कपाशीचे पीक अद्याप वावरात आहे आणि यावर लाल्या रोग अटॅक करत आहे. लाल्या रोगामुळे पाने लाल पडतात,तसेच फुलपानाची गळती होते. हे असे लक्षण दिसताच क्षणी 4 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 1 लिटर पाण्यासाठी हे प्रमाण घेऊन दोन ते तीन फवारण्या करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. तसेच आपण ह्याऐवजी मॅग्नेशियम सल्फेट जमिनीतून सुद्धा देऊ शकता यासाठी आपण एकरी 8 ते 10 किलो हे प्रमाण ठेऊ शकता. यामुळे कपाशी पिकावर आलेल्या लाल्या रोगावर नियंत्रण प्राप्त करता येऊ शकते.
संदर्भ टीव्ही 9
Published on: 09 December 2021, 05:48 IST