अलीकडच्या काळात भेडसावणारा प्रश्न झालाय तो म्हणजे हरभरा पिकातील वाढणारा मर रोग व त्यावरील नियंत्रण याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.मर रोगाची सुरुवात बघायची असेल तर आपल्याला खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात झालेला पाऊस याकडे बघायला हवे त्या झालेल्या पावसामुळे जमिनीत असलेला ओलावा हा मर रोग वाढवण्यासाठी पोषक ठरत आहे त्यामुळे पेरणीनंतर जमिनीत असलेला ओलावा अथवा जास्त ओला ओलाव्यावर झालेली पेरणी यामुळे मर रोगाची लक्षणे दिवसेंदिवस वाढत आहे या मर रोगाला आळा
घालण्यासाठी शेतकरी वर्ग ज्या मित्र बुरशीचा वापर करत आहेत Farmers who are using friendly fungi for planting ते म्हणजे जगातील शक्तिशाली असलेले ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक होय ट्रायकोडर्मा मित्र बुरशीचे कार्यपध्दती:- पिकामधील
प्रगत कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना सहजतेने उपलब्ध व्हावे :- कृषि आयुक्त धीरजकुमार
(मर, खोडकूज, मुळ कूज, अस्कोकायटा करपा ) या रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही त्यामुळे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा मित्र बुरशीचा उपयोग हरभरा पिकांवरील रोग नियंत्रणकरिता होत आहे. या
बुरशीच्या ९० च्या आसपास प्रजाती आढळतात. त्यापैकी ट्रायकोडर्मा व्हीरिडी,ट्रायकोडर्मा अस्पेरीलम, ट्रायकोडर्मा हरजीयानम या प्रजाती मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. ही बुरशी जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या रोगकारक बुरशी जसे फ्युसारीयम, रायझोकटोनिया, स्क्लेरोशिअम, पिथीयम, फायटोपथोरा इत्यादी बुरशींचा नायनाट मोठ्या प्रमाणात करते. सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या तंतुमध्ये विळखा घालून त्याभोवती आपले साम्राज्य वाढवते म्हणजेच तंतुमय वाढीचे आवरण तयार करते तसेच
ही बुरशी ग्लायोटोक्झीन सारखे प्रतीजैविके निर्माण करून हानिकारक बुरशीला वाढीसाठी लागणारे सत्व शोषून घेऊन तिची वाढ पूर्णतः थांबवते व वाढ थांबल्याने कालांतराने मर रोगाची बुरशी नष्ट होते तसेच ट्रायकोडर्मा मित्र बुरशी पिकांच्या मुळांवर तयार केलेल्या आवरणावर एक्वायर्ड रेसिस्टंस (SAR)निर्माण करते त्यामुळे जमिनीतील हानीकारक बुरशीपासून पिकांचे रक्षण करते.ट्रायकोडर्मा चे फायदे:- १)हरभरा बियाण्याची उगवण क्षमता वाढते२)प्रती हेक्टरी पिकाचे उत्पादनात वाढ होते ३)हरभरा पिकातील जमिनीतून अथवा बियाणाद्वारे
पसरणाऱ्या मर रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो खोडकूज मुळकुज ,कानी करपा रोप कुजने जने ,कंदकुज ,कंठिका कुज कोळशी कुज चिकट्या काणी बोटरायटीस ब्लॅक सार्क या रोगापासून संरक्षण मिळते संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण मिळते४)ट्रायकोडर्मा या बुरशींची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवणशक्ती वाढण्यास मदत होते.५)रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते.५)जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
६)ट्रायकोडर्मा ही बुरशी नैसर्गिक घटक असून, पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.६)रासायनिक बुरशीनाशकांप्रमाणे माती, पाणी, व पक्षी यांच्या आरोग्यास धोका पोचत नाही. ही बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थावर वाढत असल्यामुळे रासायनिक बुरशींनाशकापेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो त्यामुळे पिकांचे संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होते.हरभरा पिकात तीन टप्यात करावयाचाया ट्रायकोडर्माचा तीन टप्प्यात शेतीमधील हरभरा पिकात वापरामुळे आपल्याला मर रोग नियंत्रण सोपे होत असून उत्पादनात वाढ होत आहे.
तीन टप्पे:- १)माती संस्करण२) बीज प्रक्रिया ३) फवारणी नियोजन१)माती संस्करण:- चार ते पाच किलो ट्रायकोडर्मा भुकटी पावडर चांगल्या कुजलेल्या 50 किलो शेणखतात मिसळून संध्याकाळच्या वेळी एक एकर क्षेत्रात मातीत मिसळावे२) बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया पेरणीच्या वेळी ५ मिली पीएसबी ५मिली रायझोबियम ५मिली ट्रॅकोड्रर्माची बीज प्रक्रिया करावी त्यासाठी एक लिटर पाण्यात त १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो त्यात वरील तीन घटक एकत्र मिसळून त्यानंतर ते बियाण्याला लावून पेरणी करावी३)फवारणी नियोजन:- तिसरी सर्वात महत्त्वाची
म्हणजे हरभरा पिकाला 15 ते 20 दिवसांनी पहिले पाणी दिल्यानंतर फवारणीतून शंभर ग्राम प्रति 15 लिटर टाकून ओल्या रानात फवारणी करावीया तिन्ही पद्धतीने काटेकोरपणे नियोजन केले तर हमखास हरभरा पिकातील मर रोगाला प्रतिबंध बसून पिकाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते सहयाद्री फाउंडेशन च्या माध्यमातून जमिनीचा कस वाढीसाठी व शेनखत कुजवण्यासाठी 1 लिटर बॅक्टररिया कल्चर मोफत दिल्या जाते.
लेखक:- डॉ.वैभव चव्हाण
जैविक शेती मार्गदर्शक
अध्यक्ष:-सहयाद्री फाउंडेशन,हिंगोली
रघुनंदन प्लाझा, खटकाळी बायपास हिंगोली.
मो.8380838767
Published on: 30 September 2022, 06:13 IST