Agripedia

गव्हाचे बियाणे जर चांगल्या प्रकारचे असेल उत्पादनही भरघोस मिळते. बियाणे साठवण करून ठेवणे, त्याची रोग व कीड पासून काळजी घेणे गरजेचेअसते. बियाणे साठवणुकी मध्ये आढळणारे प्रमुख कीड व रोगाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 24 November, 2021 6:32 PM IST

गव्हाचे बियाणे जर चांगल्या प्रकारचे असेल उत्पादनही भरघोस मिळते. बियाणे साठवण करून ठेवणे,  त्याची रोग व कीड पासून काळजी घेणे गरजेचेअसते. बियाणे साठवणुकी मध्ये आढळणारे प्रमुख कीड व रोगाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

बियाणे साठवणूक की मधील एकात्मिक कीड व रोग नियंत्रण

  • बियाणे मधील आद्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्के ठेवावे.
  • पावसाचे पाणी साठवण्याचा ठिकाणी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ज्या ठिकाणी बियाणे साठवण करायचे आहे ते स्वच्छ ठेवावी.
  • पोत्यांची साठवणूक करताना जमिनीपासून योग्य उंचीवर करावी,जेणेकरून जमिनीशी संपर्क येणार नाही.
  • बाजारामध्ये आत्ता साठवणुकीत ठेवण्यासाठी किड नियंत्रक सापळे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा.
  • हवाबंद जागेमध्ये बियाणे साठवणूक केल्यास त्यामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कीड लागत नाही.
  • कडुलिंबाचा पाला साठवण पत्रांमध्ये मिसळून ठेवला तरी चांगल्या प्रकारे कीडनियंत्रण होऊ शकते.
  • निमतेल, निमार्क यापैकी कोणतेही एक औषध दोन मिली एक किलो बियाण्यास चोळावेकिंवा पोत्यावर बाहेरून फवारावे.
  • साठवणुकीची पोती, कनग्या, पक्की कोठारे,वाहतुकीचे साधनेआणि भिंतींच्या पट्टी मधील कीड यांचा नाश करण्यासाठी मेलोथीयान एक लिटर +100 लिटर पाणी यांचे फवारणी करावी. ही फवारणी उघड्या बियाण्यावर करू नये. त्यानंतर बियाण्याची साठवण करावी.
  • 25 टक्के पाण्यात मिसळणारी डेल्टामेथ्रीन पावडर 40 ग्रॅम + एक लिटर पाणी यांचे द्रावण साठवलेल्या पोत्यावर तसेच कोठारावर बाहेरून फवारणी करावी. ही फवारणी दर तीन महिन्यांनी करावे.
  • पावसाळ्यात गॅस युक्त धुरीजन्य औषधाने किड्यांपासुन तसेच बुरशीपासून संरक्षण करता येते. त्यासाठी साठवण ठिकाणी हवाबंद करावी. साठवलेले बियाणे प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री च्या सहाय्याने झाकून त्यात धुरिजन्य औषधाच्या पुड्या फोडून ठेवाव्यात व झाकण आठ ते दहा दिवस बंद ठेवावे. अशाप्रकारे किड, रोग आणि उंदीर नियंत्रण केल्याने पावसाळ्यात होणारे बियाण्याचे नुकसान टाळता येते.
English Summary: disease and insect management and control in seed storage
Published on: 24 November 2021, 06:32 IST