Agripedia

ढोबळी मिरचीची लागवड साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये केली जाते.आपल्या स्वयंपाकात आवर्जून ढोबळी मिरची चा समावेश असतो.या लेखात आपण ढोबळी मिरची वरील पडणारी कीड रोग आणि त्यांच्या उपाय योजनांबाबत माहिती घेऊ.

Updated on 24 November, 2021 6:37 PM IST

ढोबळी मिरचीची लागवड साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये केली जाते.आपल्या स्वयंपाकात आवर्जून ढोबळी मिरची चा समावेश असतो.या लेखात आपण ढोबळी मिरची वरील पडणारी कीड रोग आणि त्यांच्या उपाय योजनांबाबत माहिती घेऊ.

ढोबळी मिरची वरील किड व रोग

  • फुलकिडे-हे किडे अतिशय लहान आकाराचे असून रंग फिकट पिवळा असतो. पाण्यात खरवडून त्यातून बाहेर येणाऱ्या रसाचे शोषण करतात.त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात.

उपाय

 या किडीच्या बंदोबस्तासाठी रोप लावणे पासून तीन आठवड्यांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने आठ मिली डायमेथोएट दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • पांढरी माशी-ही कीड खोडा मधील रस शोषण करते.त्यामुळे कोड कमजोर बनते आणि पाने गळतात तसेच झाड सुकते.

उपाय

 प्रोफेनोफोस 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • कोळी-ही कीड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो. कोळी पानातील रसाचे शोषण करतात.त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो. फुले गळतात व फळे वेडीवाकडी होतात आणि फळांचा आकार लहान राहतो.
  • उपाय

 या किडीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडावर फवारणी करावी.

  • मावा- हे किटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील रसाचे शोषण करतात.

उपाय

 मिरचीच्या लागवडीनंतर दहा दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफास दहा लिटर पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करावी.

 ढोबळी मिरची वरील रोग व्यवस्थापन

  • मर रोग- हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो.लागण झालेली रोपे निस्तेज होतात.

उपाय

 दहा लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड मिसळून हे द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या मुळांभोवती ओतावे.

 

  • भुरी रोग- या रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते.या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाय

 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक व 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने पिकांवर दोन फवारण्या कराव्यात.

  • फळे कुजणे आणि फांद्या वाळणे- या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतो आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात.

उपाय

 या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे कडून त्यांचा नाश करावा. तसेच थायरम किंवा डायथेन एम-45 किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने तीन-चार वेळा फवारावे.

English Summary: disease and insect in chilli crop and process of management
Published on: 24 November 2021, 06:37 IST