Agripedia

भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश आहे. हॉटेल मध्ये किंवा घरी जेवण केल्यावर आपण बडीशेप ही खातोच. बडीशेप हा सगळयांच्या आवडीचा विषय आहे. खाण्याच्या पदार्थाची रुची, स्वाद, सुगंध व खमंगपण वाढविणारे मसाल्याचे पदार्थामध्ये जिरे, ओवा, जायफळ, दालचिनी, लवंग, यासोबतच बडीसोपचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे.

Updated on 20 June, 2023 9:04 AM IST

भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश आहे. हॉटेल मध्ये किंवा घरी जेवण केल्यावर आपण बडीशेप ही खातोच. बडीशेप हा सगळयांच्या आवडीचा विषय आहे. खाण्याच्या पदार्थाची रुची, स्वाद, सुगंध व खमंगपण वाढविणारे मसाल्याचे पदार्थामध्ये जिरे, ओवा, जायफळ, दालचिनी, लवंग, यासोबतच बडीसोपचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. लहान वयाच्या मुलांपासून ते वयस्कर मंडळींमध्ये बडीसोप हि लोकप्रिय असून जेवण, चहापाणी, नंतर बडीशेप खाण्याची विशेष प्रथा दिसून येते. आज आम्ही याच बडीशेप शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत.

बडीशेप भारतात फार पूर्वीपासून लागवड केली जात आहे. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बडीशेपची मागणी नेहमीच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. त्याचा भावही शेतकऱ्यांना चांगला मिळतो. पेरणीची वेळ रोपांची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत केली जाते.

बियाण्याचे प्रमाण थेट पेरणीसाठी एकरी 8 ते 10 किलो बियाणे आवश्यक आहे.

१)आर.एफ.१०१ :- हा वाण राजस्थान कृषी विद्यापीठाने सन १९९५ मध्ये विकसित करून संपूर्ण देशभर लागवड करण्याकरिता प्रसारित केला आहे. या वाणाचा पिक कालावधी १५०-१६० दिवस एवढा असून प्रती हेक्टरी १५.५ क्विटल एवढे उत्पादन मिळते.

२)को-१ :- हा वाण तामिळनाडू कृषी विद्यापीठाने १९८५ साली प्रसारित केला आहे. हा उशिरा तयार होणारा वाण असून पिकाचा जीवन कालावधी २१० ते २२० दिवस एवढा आहे. मिश्र शेतीसाठी हा उत्तम वन असून प्रती हेक्टरी ६ क्विंटल एवढे उत्पादन मिळते.

शास्त्रीय पद्धतीचा वापर करून बडीसोपची जिरायती शेती केल्यास हेक्टरी १५-१७ क्विंटल उत्पन्न मिळू शकते. लखनवी बडीसोपचे म्हणजे स्वादिष्ट आणि गोड चवीच्या बडीसोपचे प्रती हेक्टरी ५-७.५ क्किंटल एवढे उत्पादन मिळू शकते. बाजारात 150 ते 200 रुपये किलोने विकली जाते. भारतात लागवड प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणामध्ये केली जाते.

English Summary: Dill cultivation: Yield will start in 2 months; The price is Rs. 200 per kg
Published on: 25 January 2022, 12:32 IST