Agripedia

युरोप देशातील एकूण भाजीपाल्यांच्या खपा पैकी 20 ते 40 टक्के भाज्या कोबी गटात मोडतात. उष्ण कटिबंधातील देशातही विशेषतः कोबी व फूलकोबी यांची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. उष्ण हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या नवीन जातीमुळे या पिकांच्या लागवडीचा हंगाम फक्त हिवाळ्या पुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रात ही पिके जवळपास वर्षभर घेता येण्याची शक्यता आहे.

Updated on 04 November, 2021 2:17 PM IST

युरोप देशातील एकूण भाजीपाल्यांच्या खपा पैकी 20 ते 40 टक्के भाज्या कोबी गटात मोडतात. उष्ण कटिबंधातील देशातही विशेषतः  कोबी व फूलकोबी यांची लागवड बऱ्याच प्रमाणात केली जाते. उष्ण हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या नवीन जातीमुळे या पिकांच्या लागवडीचा हंगाम फक्त हिवाळ्या पुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रात ही पिके जवळपास वर्षभर घेता येण्याची शक्यता आहे.

कोबी सारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते.अशा या महत्त्वपूर्ण भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काही विकृती निर्माण होतात. या विकृती बद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकृती

  • व्हिपटेल-यामध्ये फुलकोबीच्या पानाच्या पात्याची नेहमीसारखे वाढ न होता अरुंदव खुरटलेली दिसतात. झाडाचा शेंडा खुरटलेल्या राहतो व गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे हा दोष उद्भवतो. विशेषतः अम्लीय जमिनीत जिचे आमल विम्लता साडे चार पेक्षा कमी आहे तेथे ही विकृती दिसून येते.

उपाय- अशा जमिनीत चुना टाकून आम्लता कमी केल्यास रोग आढळत नाही.हेक्टरी1.2 किलो अमोनियम किंवा सोडियम मॉलीबडेट जमिनीत मिसळल्यास हा दोष आटोक्यात येऊ शकतो.

  • ब्राऊनिंग- बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे हा दोष होतो. खोडावर व फ्लावरच्या गड्यावर कुजकट व भुरकट रंगाचे डाग दिसतात.

उपाय- बोरॅक्स पावडर हेक्‍टरी 10 ते 15 किलो जमिनीत पसरून दिल्यास हा दोषआटोक्यात येतो.

  • बटनिंग- फुलकोबी मध्ये नेहमी सारखा गटा न भरता बटनासारखा अगदी छोटा गड्डा तयार होतो.पानांची वाढ ही खुंटलेली दिसते. हा दोष मुख्यतः नत्राच्या कमतरतेमुळे होतो. तसेच लवकर येणाऱ्या जाती उशिरा लावल्यामुळे गड्डा न भरता लहान राहतो.

 

उपाय- नत्रयुक्त खतांचा व योग्य पुरवठा करणे आणि हंगामाप्रमाणे योग्य जातींची लागवड करावी.

  • रायसिनेस- हा दोष फुल्ल कोबीचा गड्डा वेळीच न काढल्यामुळे दिसून येतो. काही प्रमाणात हा अनुवंशिक दोष समजला जातो. फुलकोबी चा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत आणि सुटा दिसतो.तापमानात एकदम होणाऱ्या चढ-उतारामुळे हा दोष उद्भवतो.

उपाय-काढणी वेळेवर करावी.शुद्ध व खात्रीलायक बियाणे वापरावे. रोगप्रतिकारक जाती लावाव्यात.

English Summary: dificiency of micronutrients in cauliflower group crop effect of such morbidity in crop
Published on: 04 November 2021, 02:10 IST