Agripedia

पिकांच्या योग्य वाढीसाठी 18 अन्नद्रव्यांची आवश्येकता असते. प्रत्येक अन्नद्रव्ये पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करीत असते. दुसरी अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर पिकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे या सर्व अन्नद्रव्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचे विविध खताद्वारे योग्य पुरवठा केल्यास पिकांना लागणारे पोषक घटक मिळून पिके चांगली येतात उत्पादनात वाढ होते. या लेखात आपण काही अन्नद्रव्य विषयी माहिती घेणार आहे.

Updated on 16 July, 2021 11:23 AM IST

 पिकांच्या योग्य वाढीसाठी 18 अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. प्रत्येक अन्नद्रव्ये पिकांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे कार्य करीत असते. दुसरी अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर पिकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे या सर्व अन्नद्रव्यांचे कार्य समजून घेऊन त्यांचे विविध खताद्वारे योग्य पुरवठा केल्यास पिकांना लागणारे पोषक घटक मिळून पिके चांगली येतात उत्पादनात वाढ होते. या लेखात आपण काही अन्नद्रव्य विषयी माहिती घेणार आहे.

  • नत्र व त्याचे कार्य:

पिकांच्या शरिरातील प्रथिने  आणि हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत करणारा नत्र हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पिकाची पाने हिरवीगार राहतात तसेच पानांची व खोडाची वाढ झपाट्याने होते. नत्रा  मुळे अन्नधान्य आणि कडधान्ये बियांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते. याचा योग्य पुरवठा मुळे स्फुरद व पालाश तसेच अन्य अन्नघटकांचे शोषणाला मदत होते.

 

 नत्राच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम

 नत्राच्या कमतरतेमुळे झाडाची अधिक परिपक्व झालेली पाने हळद पिवळी पडून गळतात. मुळे आणि खोडाची वाढ मंदावते. झाडांना नवीन फूट होत नाही. फुले कमी येतात. तसेच तृणधान्य, दाणे व फळे पूर्णपणे पक्व होत नाहीत. तसेच नत्राच्या अधिक मात्रा दिल्यामुळे पालवीची अधिक वाढ होऊन किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

  • स्फुरद व त्याची कार्य:

कार्य-पिकांच्या पेशींचे विघटन आणि त्यांच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज असते.स्फुरदाच्या यथायोग्य उपलब्धतेमुळेअंकुरण लवकरच होते. बाल्यावस्थेत लवकर मुळे फुटतात तसेच मुळ्यांचे जाळे तयार झाल्याने पिक जमिनीवर लोळत नाही. फुले, दाणे भरपूर येतात. त्यातील खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढते. द्विदल वनस्पती मध्ये स्फुरदाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. मुळांवरील गाठींची प्रमाणात वाढ होते.

 

 स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे

 स्फुरदाच्या कमतरतेमुळे सर्वसाधारणपणे पिकांची वाढ खुंटून तसेच तृणधान्य, कडधान्य व फळांचे उत्पादन कमी होते. पानांवर जांभळट छटा दिसतात. पानांवरील दाट हिरवेपणा आणि जांभळी छटा हे स्फुरदाच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे.

  • पालाश व त्याची कार्य:

 पिकांची वाढ जोमदारपणे होऊन धांड्यामध्ये  ताठपणा येतो. पिके अधिक वाढली तर जमिनीवर लोळत नाहीत. कोरडवाहू शेतीमध्ये पालाशच्या वापरामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते. पेशी मध्ये पाणी अधिक साठवून राहते.

पिकांमध्ये पिष्टमय आणि शर्करायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी पालाशची गरज असते.  पालाश हा विकराचा महत्वाचा घटक असून संश्लेषित शर्करा आणि पिष्टमय पदार्थ बिया, मुळे, कंदफळांकडे वाहून नेण्याचे कार्य करते.प्रथिने तयार करण्याचे कामही पालाश मुळे नियंत्रित केले जाते. कीड व रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा पालाश मुळे वाढते.

 

 पालाशच्या कमतरतेची लक्षणे

 जुन्या पानांच्या कडा पिवळसर होऊन पानांवर तांबडे ठिपके पडतात. सर्वसाधारण पिकांची वाढ मंदावते. पिकांचे धांडे कमजोर होतात. शेंडे जळतात, बिया आणि फळांचा आकार ओबडधोबड होतो.

English Summary: dificeancy of main nutritional fertilizer in crop and effect
Published on: 16 July 2021, 11:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)