Agripedia

महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही. एस. आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणा-या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या वाणांची माहिती आज आपण घेऊयात.

Updated on 29 September, 2021 5:38 PM IST

ऊस लागवडीचे तीन हंगाम

सुरु:-१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी 

पुर्वहंगामी:-१५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर, 

आडसाली:-१५ जुलै ते १५ ऑगस्ट

Co-86032 (निरा):- केंद्रीय ऊस संशोधन केंद्र पाडेगाव इथून Co-86032 (निरा) ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लागवड होणाऱ्या या वाणाची १९९६ साली निर्मिती झाली. सुरु, पूर्वहंगामी व आडसाली या तिन्ही हंगामात आपण या वाणाची लागवड करू शकतो.

 

 

वैशिष्ट्ये:-फुलोरा कमी प्रमानात किंवा लवकर येत नाही. 

इतर वाणांच्या तुलनेत बेट उमलून पडण्याचे प्रमाणात कमी

पाण्याचा ताण व क्षारपट जमिनीत टिकून राहण्याची क्षमता 

चांगला साखर उतारा

फुले 265 (COM 0265)

ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांच्याकडून प्रसारीत

वाण प्रसारित वर्ष:- जून २००७

को 86032 पेक्षा सुमारे 19.45% जास्त ऊस आणि 18.74% जास्त साखर उतारा उत्पादन,

क्षारपट जमिनीत सुध्या चांगले उत्पन्न देऊ शकते. काही दिवसांसाठी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता

स्मट, रेड रॉट, कूज व इतर रोगांना प्रतिरोधक आणि किडींना माफक प्रमाणात प्रतिरोधक विशेषत: लोकरी माव्यासाठी.

ताठ आणि गडद हिरवी पाने.

चांगली साखर टिकवून ठेवण्याची क्षमता

फुले 10001 (MS १०००१)

ही लवकर पक्क उसाची वाण महाराष्ट्र राज्य राज्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथून प्रसारित करण्यात आली आहे.

फुले 10001 ची प्रमुख वैशिष्ट्ये (MS 10001):-

लवकर परिपक्कता 10-12 महिने.

मुळांमध्ये मातीधरून ठेवण्याची चांगली क्षमता. उच्च क्षारता सहनशीलता.

उसाची जाडी (व्यास 3.30 सेमी). 

पानावर कुसळे तयार होत नाहीत.

रोग व खोडकिडीस सहनशील.

सुरु व पूर्वहंगामी लागवड केल्यास उत्तम उतारा मिळतो.

 

संकलन - IPM SCHOOL

 

English Summary: diffrent varities of sugercane and their characters
Published on: 29 September 2021, 05:38 IST