Agripedia

राज्यातील कृषि विद्यापीठांनी कमी,मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे,अवर्षणास प्रतिकारक्षम,कीड व रोग प्रतिकारक ,चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत.सदरील वाण व वैशिष्टे खालीलप्रमाणे.

Updated on 11 June, 2024 11:06 AM IST

डॉ.आदिनाथ ताकटे, डॉ.अनिल राजगुरू

राज्यांत गेल्या अडीच-तीन दशकापासून सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे, कमी कालावधीत,कमी खर्चात,कमी श्रमात आणि पुरेशा पावसावर येणाऱ्या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी कमी,मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे,अवर्षणास प्रतिकारक्षम,कीड व रोग प्रतिकारक ,चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत.सदरील वाण व वैशिष्टे खालीलप्रमाणे.

कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण: जे एस ९३०५ , एम ए यु एस १५८, एम ए यू एस ६१२ , एम ए सी एस १४६०, एन आर सी १५७
मध्यम कालावधीत परिपक्व होणारे वाण: फुले दुर्वा, फुले किमया, एम ए यू एस ७२५ , एम ए यू एस ७१, सुवर्ण सोया, जे एस ३३५ ,
उशिरा कालावधीत परिपक्व होणारे वाण: फुले संगम , फुले किमया,
दुष्काळ सदृश्य परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण : एमएयूएस-७१(समृद्धी), एमएयूएस६१२, एमएसीएस१४६०, जे एस ९५-६०

महात्मा फुले कृषि विदयापीठ राहुरी विकसित वाण
फुले संगम (KDS 726)
प्रसारण वर्ष : २०१६ दक्षिण महाराष्ट्र , तेलंगणा , आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यांत लागवडीसाठी शिफारस
परिपक्वता कालावधी : १००-१०५ दिवस
वैशिष्ट्य: जाड व चमकदार दाणा,भारी जमिन व व्यवस्थापन चांगले असल्यास उत्पादन चांगले ,तांबेरा रोगास प्रतिकारक
हेक्टरी उत्पादन :२५-३० क्विं./हे.

फुले किमया (KDS753)
प्रसारण वर्ष : २०१७, दक्षिण महाराष्ट्र ,तेलंगणा ,आंध्रप्रदेश कर्नाटक ,गुजरात दक्षिण राज्स्तःन ,झारखंड,छत्तीसगड ओरिसा आणि ईशान्य्क्डील राज्यासाठी शिफारशीत
परिपक्वता कालावधी : १००-१०५ दिवस
वैशिष्ट्य : जाड व चमकदार दाणा ,तांबेरा रोगास प्रतिकारक्षम ,
हेक्टरी उत्पादन : २७-३२ क्विं./हे.

फुले दुर्वा (KDS 992)
प्रसारण वर्ष : २०२१, दक्षिण महाराष्ट्र ,तेलंगणा ,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यांत लागवडीसाठी शिफारस
परिपक्वता कालावधी : ९५-१०० दिवस
वैशिष्ट्य : तांबेरा रोग,खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन : २७-३५ क्विं./हे.

फुले अग्रणी (KDS 344)
प्रसारण वर्ष : २०१५,दक्षिण महाराष्ट्र. तेलंगणा,आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यासाठी शिफारशीत
परिपक्वता कालावधी : १००-१०५ दिवस
वैशिष्ट्य : तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन : २५-३० क्विं./हे.

फुले कल्याणी (DS 228)
प्रसारण वर्ष : २००६
परिपक्वता कालावधी : ९५-१०० दिवस
वैशिष्ट्य : दाण्याचा रंग फिकट पिवळा ,मध्यम आकाराचे दाणे,तांबेरा रोगास कमी बळी पडणारा
हेक्टरी उत्पादन : २३-२५ क्विं./हे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ ,परभणी विकसित वाण
एम ए यू एस -७१ (समृद्धी)
प्रसारण वर्ष : २०१०
परिपक्वता कालावधी : ९५-१०० दिवस
वैशिष्ट्य : मध्यम ते भारी जमिनीत लागवडीस योग्य ,शेंगा न फुटणारे वाण,अवर्षणासं प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन : २८-३० क्विं./हे.

एमएयूएस -१५८
प्रसारण वर्ष : २०१०
परिपक्वता कालावधी : ९३ -९८ दिवस
वैशिष्ट्य : हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य
हेक्टरी उत्पादन : २६-३१ क्विं./हे.

एमएयूएस -६१२
प्रसारण वर्ष : २०१६
परिपक्वता कालावधी : ९४ - ९८ दिवस
वैशिष्ट्य : उंच वाढणारे,वातावरण बदलामध्ये ताग धरणारे,दुष्काळ सदृश्य परिस्थितीत व आंतरपीक पद्धतीत अतिशय योग्य वाण
हेक्टरी उत्पादन : ३०-३२ क्विं./हे.

एमएयूएस १६२
प्रसारण वर्ष :
परिपक्वता कालावधी : १००-१०३ दिवस
वैशिष्ट्य : उभट वाण, परिपक्वतेनंतर
हेक्टरी उत्पादन : २८-३० क्विं./हे.

डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ ,अकोला विकसित वाण
पीकेव्ही अंबा ( एएमएस १००-३९)
प्रसारण वर्ष : २०२१
परिपक्वता कालावधी : ९४ -९६ दिवस
वैशिष्ट्य : लवकर परिपक्व होणारे वाण, मध्यम जमिनीत अत्यंत चांगले उत्पादन देणारे वाण, बदलत्या हवामानास अनुकूल वाण, शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी, मूळकुज /खोडकुज ,चक्रीभूंगा , खोडमाशी प्रतिकारक
हेक्टरी उत्पादन : २८-३० क्विं./हे.

पीडीकेव्ही ( यलो गोल्ड ) ( एएमएस १००१)
प्रसारण वर्ष : २०१८-१९
परिपक्वता कालावधी : ९५-१०० दिवस
वैशिष्ट्य : मध्यम कालावधीत येणारे,मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास हमखास चांगले उत्पादन, मूळकुज व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम, परिपक्वते नंतर १० दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक
हेक्टरी उत्पादन : २२-२६ क्विं./हे.

पीडीकेव्ही सुवर्ण सोया (एएमएस- एमबी ५-१८ )
प्रसारण वर्ष : २०१९-२०
परिपक्वता कालावधी : ९८-१०२ दिवस
वैशिष्ट्य : मूळकुज, खोडकुज, पानावरील ठिपके या रोगास प्रतिकारक, चक्रीभुंगा ,खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक
हेक्टरी उत्पादन : २४-२८ क्विं./हे.

पीडीकेव्ही पूर्वा (एएमएस २०१४-१)
प्रसारण वर्ष : २०२०-२१, पूर्व भारतातातील राज्याकरिता प्रसारित, पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्त
परिपक्वता कालावधी : १०२-१०५ दिवस
वैशिष्ट्य : पिवळा मोझॅक या रोगास प्रतिकारक,चक्रीभुंगा ,खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक, परिपक्वते नंतर १० दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक,
हेक्टरी उत्पादन : २२-२६ क्विं./हे.

आघारकर संशोधन संस्था ,पुणे विकसित वाण
एमएसीएस १४६०
प्रसारण वर्ष : २०२१
परिपक्वता कालावधी : ९५ दिवस
वैशिष्ट्य : चांगले उत्पादन देणारे वाण , कमी कालावधित पक्व होणारा ,दुष्काळसदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण ,कीड व रोगास कमी बळी पडते ,यांत्रिक कापणीस योग्य
हेक्टरी उत्पादन : २२-३८ क्विं./हे.

एमएसीएस ११८८
प्रसारण वर्ष : २०१२
परिपक्वता कालावधी : ११० दिवस
वैशिष्ट्य : काढणीच्या वेळी शेंगा फुटत नाही, यांत्रिक कापणीस योग्य ,
हेक्टरी उत्पादन : २८-३५ क्विं./हे.

एम ए सी एस १४०७
प्रसारण वर्ष : २०२१
परिपक्वता कालावधी : १०४ दिवस
वैशिष्ट्य : काढणीच्या वेळेस शेंगा फुटत नाही ,खोडमाशी प्रतिरोधक
हेक्टरी उत्पादन : २० -३० क्विं./हे.

एमएसीएस १५२०
प्रसारण वर्ष : २०२१
परिपक्वता कालावधी : १०० दिवस
वैशिष्ट्य : यांत्रिक कापणीस योग्य,खोडमाशी प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन : २१-२९ ./हे.

भारतीय सोयाबीन संशोधन संस्था ,इंदोर ,मध्यप्रदेश विकसित वाण
एन आर सी ३७ (अहिल्या -४)
प्रसारण वर्ष : २०१७, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ,राजस्थान या राज्यांत लागवडीसाठी शिफारस
परिपक्वता कालावधी : ९६-१०२ दिवस
वैशिष्ट्य : चांगला उत्पादन देणारा वाण
हेक्टरी उत्पादन : ३५-४० क्विं./हे.

एन आर सी १५७
प्रसारण वर्ष : २०२१-२२
परिपक्वता कालावधी : ९४ दिवस
वैशिष्ट्य : उशिरा लागवडीसाठी ( २० जुलै पर्यंत) शिफारशीत वाण
हेक्टरी उत्पादन : १६-२० क्विं./हे.

एन आर सी १३८ (इंदोर सोया १३८)
प्रसारण वर्ष : २०२१
परिपक्वताकालावधी : ९०-९४ दिवस
वैशिष्ट्य : तांबेरा आणि पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक्षम
हेक्टरी उत्पादन : २५-३० क्विं./हे.

जवाहरलाल नेहरू कृषि विश्व विदयापीठ , जबलपूर ,मध्यप्रदेश विकसित वाण
जे एस ३३५
प्रसारण वर्ष : १९९४
परिपक्वता कालावधी : ९५-१०० दिवस
वैशिष्ट्य : मध्यम ते भारी जमिनीत लागवडीस योग्य ,हळवा वाण दाण्याचा रंग पिवळा , मध्यम आकाराचे दाणे , आंतरपिकास योग्य
हेक्टरी उत्पादन : २५-२८ क्विं./हे.

जे एस २०९८
प्रसारण वर्ष : २०१७-१८
परिपक्वताकालावधी : ९५-९८ दिवस
वैशिष्ट्य : उंच वाढणारे असल्याने हार्वेस्टर ने काढण्यास योग्य वाण
हेक्टरी उत्पादन : २५-२८ क्विं./हे.

जे एस ९३-०५
प्रसारण वर्ष : २००२
परिपक्वता कालावधी : ८५-९०
वैशिष्ट्य : लवकर येणारे वाण,हलकी व मध्यम जमिन, न पडणारे व शेंगा न फुटणारे वाण
हेक्टरी उत्पादन : २५-२८ क्विं./हे.

जे एस ९५-६०
प्रसारण वर्ष : -
परिपक्वता कालावधी : ८२-८८ दिवस
वैशिष्ट्य : जाड दाणा,चार दाण्याचा शेंगा असलेले तसेच दुष्काळ सदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण
हेक्टरी उत्पादन : २०-२५ क्विं./हे.

(संकलित माहिती: महाराष्ट्र राज्य कृषि विद्यापीठे , आघारकर संशोधन संस्था ,जवाहरलाल नेहरू कृषि विश्व विदयापीठ , जबलपूर ,मध्यप्रदेश, भारतीय सोयाबीन संशोधन संस्था ,इंदोर )

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ.अनिल राजगुरू,सहाय्यक प्राध्यापक, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग कृषि महाविद्यालय, पुणे, मो.९४२१९५२३२४

English Summary: Different varieties and characteristics of soybeans
Published on: 11 June 2024, 11:06 IST