गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर डिझेल आणि पेट्रोलची दर वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. असे असताना आता याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. या हंगामात डिझेल दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या (Tracter) साह्याने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मशागतीच्या दरात ट्रॅक्टरमालकांनी वाढ केली आहे.
आता शेतकऱ्यांना एकरी मशागतीसाठी २०० रुपयांची वाढ झाली आहे. असे असताना अनेक ठिकाणी मात्र डिझेलची दरवाढ झाल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले जातात. यामुळे आता याची मोठी झळ बसू लागली आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही आणखी वाढणार आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न पडला आहे. शेतकरी देखील सध्या अनेक संकटाचा सामना करत आहे. तसेच त्याच्या मालाला बाजारभाव देखील नाही.
सध्या शेतीतील मशागतीची संपूर्ण कामे ट्रॅक्टरने केली जातात. रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, पंजी, अशा वेगवेगळ्या मशागती केल्या जातात. सध्या थ्रेशरच्या साह्याने हरभरा मळणीचे कामही होत आहे. या सर्वच कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. तसेच ऊस वाहतुकीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे. यामुळे अनेकांनी आपले दर वाढवले आहेत.
यामुळे सध्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात डिझेल पुरविण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. वाशीम जिल्ह्यात गहू काढणीचा दर हार्वेस्टरने एकरी बाराशे रुपये होता. तो दर यंदा पंधराशे रुपये असा घेतला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी गहू (Wheat) काढणीचा दर १,५०० रुपये प्रति एकर होता तो या वर्षी २,००० रुपयांपर्यंत वाढला आहे. अशीच परिस्थिती सर्व राज्यात आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेततळे अनुदानात झालीय वाढ, भविष्याचा विचार करून आताच करा सोय, 'असा' करा कर्ज
'नुकसान झालेल्या उसाला प्रती टन पाचशे रुपयांची भरपाई द्यावी'
गायींना गाणी ऐकवली तर तब्बल ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने विडिओ बनवून केले सिद्ध
Published on: 02 April 2022, 12:57 IST