आपल्या शेतात गाजर गवत आहे का ? जशी बाग फुलांची बाग लावावी त्याप्रमाणे गाजर गवत आपल्या शेतात उतरत असते. अनेक शेतकऱ्यांना या गाजर गवतने नको नको करुन सोडलं आहे. गाजर गवताला काही ठिकाणी काग्रेस नावानेही ओळखले जाते. शेत जमिनीवर हे गवत मोठ्या जोमात उगत असते. या गवतामुळे पेरणीसाठी जमीन तयार करणे खूप कठिण काम होऊ बसते. या गवताला नष्ट करण्यासाठी रासायनिक खाद्य किंवा हाताने त्याला उपटावे लागते परंतु हे गवत विषारी असल्याने त्याची एलर्जी होत असते. दरम्यान हे गाजर गवत अमेरिकेची देन आहे.
१९५० मध्ये अमेरिकेहून भारतात गव्हाचे निर्यात करण्यात आली होती, गव्हाबरोबर गाजर गवताच्या बियाही अमेरिकेहून आल्या. १९५५ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात हे गवत सर्वात आधी आढळले होते. या गवताशी दोन हात करण्यास शेतकऱ्यांना मोठं आव्हानात्मक काम असतं. परंतु आता हे काम सोपं होणार आहे. नैसर्गिक पद्धतीने या गवताची विल्हेवाट लावता येणार आहे. स्थानिक पातळीवर संशोधन केल्यानंतर हा अहवाल भारतीय कृषी अनुसंधान केंद्राकाडे पाठविण्यात आला आहे. ठाकूर छेदीलाल बॅरिस्टर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर एंड रिसर्च सेंटरचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. आरकेएस तोमर यांनी गाजर गवताच्या निर्मूलनाविषयी एक संशोधन केले आहे.
भारतीय कृषी अनुसंधान केंद्राने मंजुरी दिल्यानंतर कीटकांचा झुंड गाजर गवत असलेल्या परिसरात सोडले जातील. मॅक्सिकन बीटलचं शास्त्रीय नाव आहे, जाइकोग्रामा बॅकोलोराटा. मॅक्सिकन बीटल कीटकाची प्रजनन काळी जुलै आणि ऑगस्ट महिना असतो. या कीटकाला गाजर गवतावर ठेवले जाते. एका आठवड्याच्या आत मध्ये पानांने खाऊन गाजर गवत नष्ट करत असते. जनावरे आणि माणसांसाठी ही हानीकारक गवत आहे. या गवताची एलर्जी होत असते. अस्थमा आणि त्वचेच्या आजार या गवतामुळे होत असतात. खरपतवार विज्ञान संशोधन केंद्रात या गवतांविषयी संशोधन करण्यात आले. या गवतात सेस्क्वेटरिन लॅक्टन नावाचा एक विषारी पदार्थ सापडला आहे. आपल्या क्षेत्रातील ४० ते ४५ पिकांचे नुकसान हे गवत करत असते. तर दूध उत्पादकांही याचा फटका बसत असतो. जर दुधाळ प्राण्यांनी हे गवत खाल्ले तर दुग्ध उत्पादनाची क्षमता ४० टक्क्यांनी कमी होत असते.
Published on: 12 July 2020, 05:04 IST