Agripedia

आपली गोमाता जोपासा.जैविक शेती करा.विषमुक्त अन्न खा. २४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये

Updated on 12 March, 2022 3:49 PM IST

आपली गोमाता जोपासा.जैविक शेती करा.विषमुक्त अन्न खा. २४ जून १८१३ म्हणजे २०७ वर्षापूर्वी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये How to christanise India ?

( भारत देश ख्रिस्तमय कसा करायचा ?) यावर चर्चा होऊन बिल मंजूर झाले. भारताचा सहा महिने ब्रिटिश तज्ज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले.

१) भारत ९५ % शेतीप्रधान देश आहे. कारण इथली शेती अतिशय समृध्द आहे.

२) उत्तम धनधान्य मुबलक आहे. घरोघरी सोनं नाणं भरपूर आहे.

३) या शेतीचा मुळ आधार आहे देशी गाय, आणि ही गाय नष्ट झाली तर शेती व्यवस्था नष्ट होईल. व गरीब झालेले लोक ख्रिस्त होतील.

       आणि यासाठी १८२० साली गाईंच्या कत्तलीसाठी पहिला कत्तलखाना कलकत्त्याला सुरू झाला, आणि त्यानंतर गोवंशाची बेसुमार कत्तल झाली. देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा कत्तली चालूच राहिल्या. गोमांसाचे (मीट ) महत्त्व परदेशात वाढत गेले. यामुळं गेल्या २०० वर्षानंतर फक्त एक टक्का देशी गाय देशात शिल्लक आहे. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं व त्याला आमच्याच राज्यकर्त्यांनी नंतर मोठ्याप्रमाणात सहकार्य केले आहे.

गायीच्या उत्पत्तीविषयी पुराणात अनेक प्रकारच्या कथा आढळतात. सर्वप्रथम, जेव्हा ब्रह्मा एका तोंडातून अमृत पीत होते, तेव्हा त्याच्या दुसर्‍या तोंडातून काही झाकण बाहेर आले आणि त्यातून मूळ गाय ‘सुरभी’ जन्माला आली.

दुसऱ्या कथेत असे म्हटले आहे की दक्ष प्रजापतीला साठ मुली होत्या, त्यापैकी एक सुरभी होती.

तिसऱ्या ठिकाणी असे म्हटले आहे की सुरभी म्हणजेच स्वर्गीय गाय महासागर मंथनाच्या वेळी चौदा रत्ने घेऊन जन्माला आली होती. सोनेरी रंगाची कपिला गाय सुरभीपासून जन्माला आली. ज्यांच्या दुधातून क्षीर सागर तयार झाला.

भागवत पुराणानुसार, सागर मंथन (समुद्र मंथन) दरम्यान दिव्य वैदिक गाय (गौ-माता) च्या निर्मितीची कथा प्रकाशात आणतो. नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला, बहुला या पाच दिव्य कामधेनु (प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी वैदिक गाय) मंथनातून बाहेर पडली आणि येथूनच दिव्य अमृत पंचगव्य उगम पावते.

ब्रम्हाने घेतलेली कामधेनु किंवा सुरभी, दिव्य वैदिक गाय (गाय-माता) geषींना देण्यात आली होती, जेणेकरून त्याची दिव्य अमृत पंचगव्य यज्ञ, आध्यात्मिक विधी आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी वापरली जाऊ शकेल.

           गोधन नष्ट करताना दूध कमी पडू नये म्हणून गेल्या ७० वर्षात जर्सी, होस्टन सारख्या गायींची पैदास वाढवली. यामुळं कॅन्सर सारखे रोग पसरले.

       कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कॅन्सर ने थैमान घातले ते केवळ संकरित गाईच्या विषारी दुधामुळे आहे, हे आता सिद्ध झाले आहे. याबाबत सखोल संशोधन करणारे कणेरी मठाचे पूज्य काडसिद्धेश्र्वर महाराज म्हणतात

 १) संकरित गायीचं दूध विष आहे. तर देशी गाईचं दूध आईच्या दुधा प्रमाणे अमृत आहे.

२) संकरित गाईच्या दुधामुळे शरीरातील इंद्रियां च्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो, तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढते व सर्व इंद्रिय उत्तम कार्यक्षम होतात.

३) संकरित गाय भरपूर दूध देणाऱ्या म्हणून चौपट महाग आणि देशी गाय कमी दूध देते म्हणून स्वस्त आहे. पण संकरित गायींच्या दुधामुळे शरीर जर्जर व रोगग्रस्त होतं, ( मधुमेहाच प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण हे दूध आहे) तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढल्याने शरीर मजबूत व व्याधिमुक्त होते.

४) आज अनेक गर्भश्रीमंत कारखानदार, नटनट्या, उद्योगपती स्वतःच्या शरिरस्वास्थ्यासाठी एक हजार रुपये प्रति लिटर भावाने देशी गाईचे दूध, आठ ते दहा हजार रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत. यांच्यासाठी खास देशी गाईचे गोठे तयार केले आहेत.

         भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमध्ये नेली, इथल्या वळूना त्यांनी नेलं, आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय तयार केली. गीर, लाल सिंधी, साहिवाल, कांकरेज या भरपूर दूध देणाऱ्या गायींची पैदास राज्यकर्त्यांनी वाढवली नाही, उलट संकरित गाईंच विषारी दूध पाजून परदेशी अँलोपथ्यी औषधांसाठी बाजारपेठ तयार करण्यासाठी या देशातील लोकांचे शरीर व्याधीग्रस्त कसे होईल याची व्यवस्था केली.

मुळ भारतातून नष्ट नामशेष झालेली ब्राह्मण ही देशी गायींची जात फक्त अमेरिकेत आहे. या गायींची करोडो रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया देश विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय व वळूंना नेले. संशोधन करून गाय पैदास केली. उत्तम प्रकारचे दूध मिळवलं आणि आमच्या राज्यकर्त्यांनी विषारी दुधाच्या जर्सी, हॉस्टन सारख्या विषारी दुधाच्या गायींची पैदास करण्याचं कारस्थान करून आपल्याच जनतेला व्याधीग्रस्त केले आहे.

       जगात कोणत्याही गायीला वशिंड नाही फक्त भारतीय गायींना वशिंड आहे. या वशिंडात सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या जीन्स मध्ये प्राकृत शारीरिक प्रतिकारक्षमता तयार होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टीक दूध मानवाला मिळते. देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे, शिवाय मानव शरीर तंदुरुस्त व व्याधीमुक्त राहते. यामुळं पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होतं.

       अर्थात दूध हा गायीचा उपपदार्थ आहे. गाय दूध फक्त व्याल्यावर काही काळ देते. सतत देत नाही. गायीपासून कायम मिळणारा मुख्य पदार्थ म्हणजे शेण (गोमय) आणि मूत्र (गोमूत्र).

       गायीच्या शेणात व मुत्रात जीवाणू निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद्रिय खत जमिनीत तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण होते.जैविक.शेतीला प्राधान्य मिळते.

 

रवी शर्मा

English Summary: Deshi cow importance bio farming
Published on: 12 March 2022, 03:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)