थोडं पण महत्वाचं शेतात कम्पोस्ट खत वापरावर अनेक मर्यादा पडतात. बाहेरून उचलून हे खत शेतात आणून टाकणे हे शेती साठी योग्य नाही. आपन त्याऐवजी आधीच्या पिकाचे काडीकचरा पाला पाचोळा काही मुळांचा भाग असे बरेचसे अवशेष शेतातच ठेवून ते शेतामधेच कुजू दिले, तर त्यापासून कमी वेळ व कमी खर्चात उत्तम खत आपल्याला जागेवरच मिळत रहातं आपल्या शेतात जर पर्हाटीला स्लैडरने बारीक करून ते शेतामध्ये गाळता येते.ते कुजवल्यावर मिळालेले खत अधिक चांगल्या दर्जाचे असते.निसर्ग ठरवतं असते की कोणाला लवकर कुजवायचं !कुजणारी प्रक्रिया ही नैसर्गिक नियम असते.प्रथम झाडांची पाने व कोवळे देठ हे कुजण्यास हलके हलके जाते व देठाचा भाग हा मध्यम कुजणारा असतो आणि बुंधा आणि मुळं हे कुजण्यास थोडं वेळ लागतो. मातीच्या नियमानुसार वनस्पतीचे घटक कुजण्यास जितका जास्त जड, तेवढा तो जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्वाचाअसतो.
हेच वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर झाडाचा जो जाड भाग जळण्यास वेळ घेतो व अग्नी जास्त वेळ रहाते तसेच हे आहे तोच भाग कुजून जमिनीला जास्त सुपीकता मिळते. आपल्याला माहीती असेल किंवा नसेल की निसर्गाने कुजवण्याच काम हे बुरशी ला दिलं असतं! जो कुजनारा जड पदार्थ हे बुरशी कुजत असते. जे कुजण्यास हलके जाणारे पदार्थ हे जीवाणू कुजवतात.लवकर कुजवणारं त्याच बरोबर मध्यम कुजवणारं आणी जड कुजवणारं अशा सर्व प्रकारच्या जीवाणुला जमिनीत त्यांचे अन्न मिळाले तर जमिनीत सेंद्रिय सुपीकता निर्माण होत असते. जे जिवाणू सहज कुजवणारे असतात ते माती मधे कणांची रचना निर्माण करतात पावसामुळे ती कणरचना सहज बदलत असते यामुळे योग्य निचरा होतच नाही. याउलट वजणदार पदार्थ कुजवणारे जीवाणू कणरचना निर्माण करतात, ती पाण्यात स्थिर राहते व मातीमधे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, तेंव्हाच सेंद्रीय पदार्थ कुजवणारे जीवाणू कुजणार्या पदार्थातील अन्नद्रव्यांबरोबरच त्या परिसरात उपलब्ध असणारी सर्व अन्नघटक स्वतःच्या वाढीसाठी जिवाणू हे वापरतात
आणि यामुळे तिथे वाढणार्या झाडांच्या मुळांची व जीवाणूंची एक प्रकारची स्पर्धा करावी लागत असते त्या मुळे पीकाची एक प्रकारे उपासमार होत असते.हा सेंद्रीय पदार्थ पूर्ण कुजल्यावरच पीकाला अन्नघटक मिळतात.आपन जर कोणतेही कल्टीवेटर,रोटाव्हेटर किंवा नांगरणी केले तर मातीमधे सेंद्रीय पदार्थाचे बारीक तुकडे होऊन मातीत मिसळतात व जर कुजण्याची प्रक्रिया जलद झाली तर कुजवीणार्या जीवाणूंची वेगाने वाढ झाल्याने पीक हे कुपोषित होण्याचा धोका वाढतो.त्यामुळे जमिनीखालची मुळं व झाडाची घटक शक्यतो जमिनीखालीच कुजवावी हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो पिकाचे तुकडे वरच्यावर करून त्याचे आच्छादन करावे. मुळांना धक्का न लावल्यास ती कुजण्याचा वेग अतिशय मंद राहतो आणि पिकाला योग्य प्रमाणात अन्नघटक मिळत राहतात.आपन मातीमधे पिकांच्या मुळ्यांना वाढण्यास योग्य वेळ दिला पाहिजे. त्यांना पाणी आणि अन्नद्रव्य गरजेप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजेत, जिवाणू वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली तर पिकांना जमिनीची सुपीकता साकार होते.जमीन हे जिवंत परीस्ंस्था आहे.
मातीत अनेक लहान मोठे सजीव वाढत असतात, ते जमिनीला जिवंतपणा देण्याचे काम करत असते. सुपीक जमिनीचे लक्षण म्हणजे ती कायम जिवंत हिरव्या आच्छादनाने झाकलेली असली पाहिजे कारण सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणात वाढ होते व जिवाणूची सतत वाढ होत राहते. पिकांची वाढ रासायनिक पेक्षा जैविक सहभागातून झाली पाहिजे. आपन पीक फेरपालट करणे महत्त्वाचे आहे कारण रोग व कीड नियंत्रणासाठी मदत होते. जमीन त कमीत कमी हालवाहालवी झाली पाहिजे.अवजड यंत्रसामुग्री वापरल्याने मोडली जाणारी नैसर्गिक सच्छिद्रता व येणारा टणकपणा यापासून जमीन वाचणं महत्वाचं आहे.म्हणजे आपल्या केलेल्या मशागतीमुळे सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूत जास्त वेगाने रूपांतर होऊन त्याचा र्हास गरजेपेक्षा जास्त वेगाने होतो. सजिवांच्या चक्रातून जमिनीची योग्य कणरचना तयार झाली पाहिजे.जर जमिनीच्या वर वाढणारा पिकाचा भाग योग्यरित्या वाढत नसेल, तर जमिनीच्या आतील सजीवांची वाढही योग्य प्रमाणात होत नसते. उत्तम जैविक व्यवस्थापनात जमिनीत लहानमोठ्या पोकळ्या सतत तयार होत राहिल्या पाहिजेत.पोकळ्यांतून मुळांच्या आणि सूक्ष्मजीवांच्या श्वासोच्छ्वासासाठी आणि सेंद्रीय कर्बाचे कर्ब वायूमध्ये रूपांतर करण्यासाठी प्राणवायू उपलब्ध होतो. जैविक प्रक्रिया चालू राहणे म्हणजे आपली जमीन सजीव आहेअसे समजावे.
Save the soil all together
शेती बलवान तर शेतकरी धनवान
Mission agriculture soil information
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
Published on: 07 May 2022, 07:01 IST