यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे फार नुकसान झाले. सुरुवातीला सोयाबीन ला चांगले बाजार भाव होते. परंतु अचानक बर्याच कारणांमुळे यामध्ये पडझड झाली. कुठलाही शेतमालाचे बाजारभाव ठरवण्याचे प्रमुख तीन गुणवत्ता निकष असतात.
यामध्ये पहिले ते आद्रता किंवाओल त्यालाच आपण मोईश्चरअसे म्हणतो. दुसरे म्हणजे शेतमालाला मध्ये असलेले काडीकचरा, माती इत्यादी घटक त्यालाच आपण फोरेन मॅटर असे म्हणतो आणि तिसरा घटक म्हणजे शेतमालाला असलेले डाग,पावसात भिजलेले सोयाबीन त्यालाच आपण डॅमेज असे म्हणतात.या लेखात आपण या तीनही घटकांचीमाहिती घेऊ.
सोयाबीनचे भाव ठरवणारे तीन निकष
माती,काडीकचरा इ. ( फोरेन मॅटर )- त्यामध्ये प्रामुख्याने 100 किलो सोयाबीन मध्ये दोन टक्के काडीकचरा किंवा माती म्हणजेच फोरेन मॅटर हे सूट धरले जाते. अरे प्रमाण दोन टक्क्यांच्या पुढे असेल तर आठ टक्क्यांपर्यंत एकासदोन किलो घट पकडली जाते.
- याचा अर्थ काडी कचऱ्याचे प्रमाण जरा टक्क्यांपर्यंत असेल तर प्रत्येकी तीन पासून प्रति किलो दोन किलो घट पकडली जाईल. त्याचप्रमाणे हे प्रमाण आठ टक्क्याच्या पुढे असेल तर माल विकत घेण्यास नाकारलाजातो.
- डागी, काळे पडलेले, पावसात भिजलेले( डॅमेज )- 100 किलो सोयाबीन मध्ये जर दोन किलो डॅमेज सूट धरले जाते. परंतु गुणवत्ता तपासणाऱ्या डिवाइस मध्ये जर सात टक्क्यांपर्यंत डॅमेज आले तर तीन ते सात असे पाच टक्के मागे प्रत्येकी अर्धा किलो ची म्हणजे अडीच किलो घट पकडली जाते. जर डॅमेजचे प्रमाण सात टक्क्यांवर असेल तर प्रति टक्का पाऊन किलो चीघटपकडली जाते.
- आद्रता किंवा ओल( मोईश्चर )- स्टॅंडर्ड पद्धतीमध्ये मालामध्ये दहा टक्क्यांच्या पुढे आद्रता असेल तर एकाच एक म्हणजे एका टक्क्यास एक किलो पद्धतीने घट पकडली जाते. म्हणजे पंधरा टक्के मोईश्चर असेल तर त्यातून दहा टक्के वजा जाता 100 किलो मागेपाच किलोचीघटपकडली जाते. 15 ते 18 टक्के मध्ये एका टक्क्यालादोन किलो आणि अठरा च्या पुढे आद्रता असेल तर माल नाकारला जातो.( संदर्भ- ॲग्रोवन)
Published on: 26 October 2021, 10:57 IST