Agripedia

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीमोल झाले. जर सोयाबीन बाजार भाव चा विचार केला तर सध्या बाजार भाव स्थिर असून ते सहा हजार ते सहा हजार पाचशे वर स्थिरावले आहेत. मागच्या दोन वर्षापासून सोयाबीनला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे आपला कल वळवला आहे.

Updated on 15 January, 2022 8:02 PM IST

यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीमोल झाले. जर सोयाबीन बाजार भाव चा विचार केला तर सध्या बाजार भाव स्थिर असून ते सहा हजार ते सहा हजार पाचशे वर स्थिरावले आहेत. मागच्या दोन वर्षापासून सोयाबीनला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे आपला कल वळवला आहे.

सध्या बरेच शेतकरी उन्हाळी सोयाबीन ची लागवड करत असल्याने लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचे लागवड करताना ती पंधरा तारखेपर्यंत करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील तज्ञ समितीने केला आहे.

 सोयाबीन लागवडीची परिस्थिती

 सध्या बऱ्याच प्रमाणात शेतकर्‍यांचा कल हा सोयाबीन लागवडीकडे वळतआहे. उन्हाळी सोयाबीनची लागवड मुख्यतः खरीप आतील बीजोत्पादनासाठी केली जाते मात्र बियाणे सोबतच उत्पादन म्हणूनही शेतकरी सोयाबीन लागवड करीत आहेत. सोयाबीन पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते.

यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने सध्या शेतकरी सोयाबीन लागवड करीत आहेत. तसेच या वर्षी चांगला पाऊस झाल्याने सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता देखील चांगली आहे. त्यामुळे अतिवृष्टी मुळे घटलेले सोयाबीनचे उत्पादन उन्हाळी सोयाबीन च्या माध्यमातून भरून काढणे शक्य आहे. जरी सोयाबीनची पेरणी 15 तारखेपर्यंत करण्यास सांगितले असले तरी काही शेतकरी 25 तारखेपर्यंत सोयाबीन पेरू शकतात.

 या कारणांमुळे सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती……

  • मागील एक ते दोन वर्षापासून सोयाबीनला मिळणारा चांगला भाव
  • सोयाबीनच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत उपलब्ध झालेले आधुनिक तंत्रज्ञान
  • यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे पाण्याची तसेच सिंचनाची मुबलक उपलब्धता
  • सोयाबीन पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते आणि ते केवळ साडेतीन महिन्यात काढणीस येते.
  • सध्या बाजारात सोयाबीनला वाढलेली मागणी
  • या अशा बऱ्याच गोष्टी सोयाबीन लागवड वाढवायला कारणीभूत आहेत.
English Summary: dated on 15 is approprite for summer soyabioen cultivation expert advice
Published on: 15 January 2022, 08:02 IST