खजूर शेतीआपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आणि जास्त उत्पन्न देणारा ठरू शकतो. खजुराचा उपयोग विविध प्रकारचे ज्यूस, जॅम, लोणचे आणि बेकरी अशा अनेक गोष्टींमध्ये वापरली जातात.तसे पाहायला गेले तर खजूर शेतीच्या लागवडीचा विचार केला तर याला एवढा खर्च नाही.एका झाडापासून पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कमाई आरामात निश्चितपणे मिळवता येऊ शकते.पुढे योग्य नियोजन केले तर शेतकरी काही वर्षात करोडपती देखील होऊ शकतात.
आता या खजुराच्या लागवडीचा विचार केला तरपाण्याचा योग्य निचरा होणारी आणि वालुकामय जमीन सर्वात योग्य असते.व तापमान 30 अंशपेक्षा जास्त असता कामा नये. 30 अंश तापमानातखजूर फळांची वाढ खूप चांगली होते. तसेच फळ पक्व होण्यासाठी 45 अंश तापमान आवश्यक असते.
त्याचा अर्थ प्रखर सूर्यप्रकाश या फळाच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असतो. कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील माती भुसभुशीत करावी व महत्त्वाचे म्हणजे जमीन समतल करून घ्यावी. कारण यामुळे जमिनीत पाणी तुंबणार नाही आणि पाण्याची निचऱ्याची व्यवस्था योग्य राहील व झाडाचा विकास देखील चांगल्या पद्धतीने होईल.
जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर, मागणी वाढली..
खजूर लागवडीसाठी वालुकामय आणि भुसभुशीत माती लागते. यामध्ये खजूर लागवड करणे अगोदर जमीन तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. साठी अगोदर जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी शेत काही दिवस असेच पडू द्यावे. पुन्हा दोन तीन वेळा नांगरणी करावी.
खजुराच्या रोपांची लागवड करण्यासाठी शेतात एक मीटर अंतरावर खड्डे तयार करावे.या खड्ड्यांमध्ये 25 ते 30 किलो शेण मातीसह टाकावे.महत्त्वाचे म्हणजे खजुराची रोपे आणताना ती कोणत्याही सरकारी नोंदणी असलेल्या रोपवाटिकेतून विकत घ्यावी.नंतर ही रोपे खड्ड्यात लावावी.
पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार तब्बल "एवढे" अनुदान, असा घ्या लाभ..
खजूर लागवडीसाठी ऑगस्ट महिना महत्त्वाचा मानला जातो. एका एकर मध्ये 70 खजुराची रोपे लावता येतात व लागवडीनंतर तीन वर्षांनी उत्पादन देण्याससुरुवात होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आता शेतीची परंपरागत पद्धत आणि पारंपरिक पिके घेणे बंद केले असून आधुनिकतेची कास धरूनतरी वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाजीपाला त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत.
कर्नाटकमध्ये मोफत सिलेंडर, व्याजमुक्त कर्ज, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?
पाऊस घेणार विश्रांती, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाब डख यांनी सांगितली तारीख
मोचा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, ११ ते १५ मे पाऊस पडणार
Published on: 03 May 2023, 09:48 IST