शेती म्हणजे काय हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.शेतकऱ्यांना लुबाडणारे दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं, मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा नाही. कुंथत कुंथत संपादकीयचे रकाने भरण्यासारखाही शेतीचा विषय सोपा नाही.
शेती कोणताही राजकीय पक्ष, संघटनेच्या विचारांचं गुलाम राहून, त्यांची वेळोवेळी दलाली करून करता येत नाही. शेतीत शेतमजूर, अल्पभूधारक, जास्त जमीन असलेले शेतकरी असा भेदभाव करता येत नाही.पाऊस पडला तर सर्वांच्या शेतात, गारपीट, ऊन, पिकांवरील रोग सर्वांच्याच शेतात येतात, राजकीय पक्षांची दलाली करण्यासाठी इथे हिंदू-मुस्लिम, मराठा-माळी असा भेद करून शेतीचं दुकान चालवता येत नाही, शेतीत राबतांना मानेपासून माकडहाडापर्यंत घाम वाहत येतो, तेव्हा शेती फुलते,
एवढं करूनही निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकरी डोळ्यात अश्रू आणणारच, त्याला अधिकार नाही का तेवढा ही?शेतकरी काही टीव्हीवर दिसण्यासाठी चमकोगिरी करत नाही, कारण तुम्हाला आमंत्रण पाठवलंय का शेतकऱ्यांनी, आम्ही रडतोय दाखवा आम्हाला टीव्हीवर, आमचा फोटो पेपरवर लावा? कायकळणार शेतकऱ्यांचे दुःख शेतकरी हा कर्जातच जन्मतो आणि एक दिवस कर्जापासून मरतो हे मात्र वास्तव सत्य आहेसरकारी आली आणि गेली सुटा बुटातल्या एसी मध्ये बसून नाही सुटू शकणारशेतीचे प्रश्न
शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.शेतकऱ्यांना लुबाडणारे दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं, मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा नाही. कुंथत कुंथत संपादकीयचे रकाने भरण्यासारखाही शेतीचा विषय सोपा नाही.
Published on: 08 July 2022, 06:12 IST