Agripedia

कापूस या पिकाचे त्याच्या वाढीनुसार 2 प्रकार आहेत 1) सिम्पोडियल, आणि 2) मोनोपोडियल,

Updated on 24 July, 2022 3:37 PM IST

कापूस या पिकाचे त्याच्या वाढीनुसार 2 प्रकार आहेत 1) सिम्पोडियल, आणि 2) मोनोपोडियल, सिम्पोडियल प्रकारात झाड सरळ वाढते व त्याला फक्त फळफांद्या असतात, कवचित बांध कोपऱ्याला किंवा मोकळ्या ,विरळ जागेत एखादी उपफांदी असते.आणि मोनोपोडियल व्हरायटीत कापूस झाडाला 4/5 उपफांद्यां असतात व त्या सर्व उपफांद्यांना फळफांद्या असतात, व त्यांना पाती व कैरी लागते.मित्रानो कापूस पिकाचे सूक्ष्म निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येईल की काही कापसाच्या व्हरायटीमध्ये (सर्वच नाही)

झाडांना उपफांद्यां ,फळफांद्यांच्या व्यतिरिक्त एक फांदी असते तिला वाढ फांदी किंवा वांझ फांदी म्हणतात, ही वाढ फांदी झाडाच्या जमिनीकडे सर्वात खालच्या बाजूला असते व ती इतर फांद्यांपेक्षा जाड व वांझ असते तिला 2/3 पाती आणि कैरी लागते ,ही अशी फांदी आपण दिलेल्या खतांपैकी 30/40% खते व अन्न द्रव्ये खाते, त्यामुळे वरच्या फांद्यांना अन्न द्रव्याची कमतरता भासते.Therefore, the upper branches lack nutrients. या वाढ फांदीला किंवा वांझ फांदीला कटरच्या साहाय्याने कापून घेतले तर वाया जाणारे 30/40% अन्न द्रव्ये फळफांद्यांना मिळते, त्यामुळे कापूस पिकाची वाढ ही निकोप होते,कैरी चांगली पोसली जाते,झाडाची प्रतिकार

त्या सर्व उपफांद्यांना फळफांद्या असतात, व त्यांना पाती व कैरी लागते.मित्रानो कापूस पिकाचे सूक्ष्म निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येईल की काही कापसाच्या व्हरायटीमध्ये (सर्वच नाही) झाडांना उपफांद्यां ,फळफांद्यांच्या व्यतिरिक्त एक फांदी असते तिला वाढ फांदी किंवा वांझ फांदी म्हणतात, ही वाढ फांदी झाडाच्या जमिनीकडे सर्वात खालच्या बाजूला असते व ती इतर फांद्यांपेक्षा जाड व वांझ असते तिला 2/3 पाती आणि कैरी लागते ,ही अशी फांदी आपण दिलेल्या खतांपैकी 30/40% खते व अन्न द्रव्ये खाते, त्यामुळे वरच्या फांद्यांना अन्न द्रव्याची कमतरता भासते. 

क्षमता वाढते , आणि त्यामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होते. त्यासाठी श्री दादा लाड*या अनुभवी शेतकऱ्याने त्यांच्या शेतात वाढ किंवा वांझ फांदी कशी असते आणि तुम्ही लावलेल्या कापूस वाणाचे निरीक्षण करा, तुमच्या कापूस पिकात जर अशा वाढ/वांझ फांद्या असतील तर त्या कटर च्या साहाय्याने कापून टाका.त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा कापूस 5 फूट उंच झाला असेल त्यांनी आपल्या कापूस पिकाची तळा कडील फांद्यांची एकआड एक पाने तोडून घ्यावीत,म्हणजे सूर्यप्रकाश व हवा खेळती राहून कैरी पोसली जाते.तुमचा कापूस साधारणतः साडेचार ते पाच फूट उंचीचा झाला असेल तर त्याचे शेंडे खुडून घ्यावेत उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.

 

शिंदे सर

9822308251

English Summary: Cut the branches of cotton crop growth will increase the yield by 20%
Published on: 24 July 2022, 03:37 IST