Agripedia

जवळजवळ सर्वच भाजी बनवताना आपण कढीपत्त्याचा वापर करतो. कढीपत्त्याचा वापर चटणी, चिवडा इ.पदार्थांमध्ये देखील मोठ्या संख्येने करतो. कढीपत्ता मध्ये अनेक गुणधर्म दडलेली आहेत. कढीपत्त्याची लागवड करून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. चला जाणून घेऊ यात कढीपत्ता लागवडीबद्दल संपूर्ण माहिती

Updated on 21 February, 2022 7:18 PM IST

जवळजवळ सर्वच भाजी बनवताना आपण कढीपत्त्याचा वापर करतो. कढीपत्त्याचा वापर चटणी, चिवडा इ.पदार्थांमध्ये देखील मोठ्या संख्येने करतो. कढीपत्ता मध्ये अनेक गुणधर्म दडलेली आहेत. कढीपत्त्याची लागवड करून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो. चला जाणून घेऊ यात कढीपत्ता लागवडीबद्दल  संपूर्ण माहिती

  • जमीन व हवामान :-
  • कढीपत्त्याची लागवड हलक्‍या व काळ या, वाळूमिश्रित व लाल कसदार जमिनीत करता येते.
  • पाण्याचा निचरा न होणारी जमीन कढीपत्ता लागवडीसाठी निवडू नये.
  • खडकाळ, मुरमाड जमिनीत कढीपत्त्याची लागवड करता येते. परंतु उत्पादन जास्त प्रमाणात मिळत नाही.
  • कढीपत्ता लागवडीसाठी उष्ण हवामान मानवते.
  • या पिकास 26 ते 27 अंश सेल्सिअस तापमान उत्तम ठरते.
  • कढीपत्त्याच्या जाती :-
  • धारवाड येथील कृषी महाविद्यालय सेनकांपा,डीडब्ल्यूडी-1 डीडब्ल्यूडी -2 या जाती विकसित केल्या आहेत.
  • मोठ्या पानांचा आणि लहान पानांचा कडीपत्ता लागवड करता येते.
  • लागवड प्रकार :-
  • बी टोकुन बी टोकून लागवड केल्यास 3 आठवड्यांनी रोपे उगवते. रात्रभर बिया पाण्यात भिजवून ठेवून रोप उगवण कालावधी कमी करता येतो. एका बियांपासून दोन ते तीन रोपे बाहेर पडतात.
  • रोप लागवड एका वर्षाच्या रोपांची लागवड करता येते. दोन ते तीन फूट उंचीची रोपे लावता येतात.
  • लागवड पद्धत:-
  • स्वतंत्र लागवड करताना 1.2 ते 1.5 मीटर बाय 1.2 मीटर अंतरावर 30×30×30 सेमी आकाराचे खड्डे खणावेत.
  • साधारणत:25 ते 30 दिवस हे खड्डे उन्हात तापू द्यावेत.
  • त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फास्फेट अर्धा किलो मातीत मिसळून टाकावे.
  • पावसाळ्याच्या सुरुवातीस या रोपांची लागवड केल्यास ही रोपे चांगल्या प्रकारे रुजतात.
  • दुहेरी पद्धतीने लागवड करताना दोन रोपांमध्ये 30 सेमी, दोन रंगांमध्ये 1 मीटर अंतर सोडावेत.
  • झाडाच्या मुळाजवळ फुटवे येतात त्यापासून देखील लागवड करता येते.
  • पावसाळ्याच्या सुरुवातीस ही फुटवे खणून काढून त्यांची लागवड करावी.
  • पाणी व्यवस्थापन :-
  • जमीन भारी असेल तर हिवाळ्यात महिन्यातून एकदा पाणी द्यावे.
  • जमीन हलकी असेल तर हिवाळ्यात महिन्यातून दोनदा पाणी द्यावे.
  • भारी जमीन असल्यास उन्हाळ्यात 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • हलकी जमीन असल्यास उन्हाळ्यात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पावसाळ्यात गरज असेल तर पाणी द्यावे.
  • काढणी :-
  • लागवडीनंतर 9 ते 12 महिन्यांनी काढणी करावी.
  • वर्षातून 2 ते 4 वेळा काढणी करता येते.
  • उत्पादन :-
  • पहिल्या वर्षी प्रति एकरी 5 ते 10 टन उत्पादन मिळते.
  • दुसऱ्या वर्षापासून 5 ते 8 वर्षापर्यंत 15 ते 20 टन उत्पादन मिळते.

 कढीपत्त्याची योग्य लागवड केली तर त्यापासून चांगला फायदा होऊ शकतो.

English Summary: curry leaves cultivation is benificial and proper management give more profit
Published on: 21 February 2022, 07:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)