पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात. ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते. जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे. पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही.
पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात. ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते.
जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे. पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही. परंतु सुपीक जमिनी मात्र निश्चितच कसदार असतात.
जमिनीची सुपिकता ही तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर तसेच मशागतीच्या पद्धतींवर अवलंबून असते. ज्या खडकापासून जमीन तयार झाली, त्या खडकात भरपूर खनिजे असल्यास त्यापासून सुपीक जमीन तयार होते. आयन विनिमयामुळे पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. मॉन्टमोरिलोनाइट खनिजाची आयन विनिमय शक्ती जास्त असते. हे खनिज मातीत असल्यास जमिनीची सुपिकता वाढते.
जमिनीच्या सुपिकतेच्या घटकांमध्ये मातीची जोपासना, सेंद्रीय व रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, पाणी व जमीन व्यवस्थापन, योग्य मशागत, पिकांची योग्य फेरपालट, रोग व किडींचा योग्य बंदोबस्त यांचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रीय द्रव्यांमुळे जमिनीची घडण, निचरा शक्ती, आयन विनिमय शक्ती सुधारते आणि जमिनी सुपीक बनतात.
शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जमिनीत ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, ती अन्नद्रव्ये आवश्यक त्या प्रमाणात घालून त्याची योग्य पातळी राखावी. जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय आणि रासायनिक खते घालून जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक घडण सुधारून घ्यावी आणि द्विदल पिकांची योग्य प्रमाणात फेरपालट करावी.
- डॉ.जनार्दन कदम, वृषाली देशमुख (सोलापूर) मराठी विज्ञान परिषद,
Published on: 03 April 2022, 04:40 IST