Agripedia

काळाच्या ओघात शेतीक्षेत्रात बदल करणे गरजेचे झाले आहे एव्हाना अनेक लोक बदल देखील करीत आहेत. असे असले तरी अजूनही देशात अनेक शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीत विश्वास ठेवतात. पारंपारिक शेतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये सांगड घालता घालता शेतकऱ्यांच्या अक्षरशा नाकी नऊ येते. त्यामुळे शेतकरी बांधव कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. म्हणूनच पीक पद्धतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे.

Updated on 06 March, 2022 5:39 PM IST

काळाच्या ओघात शेतीक्षेत्रात बदल करणे गरजेचे झाले आहे एव्हाना अनेक लोक बदल देखील करीत आहेत. असे असले तरी अजूनही देशात अनेक शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीत विश्वास ठेवतात. पारंपारिक शेतीत उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामध्ये सांगड घालता घालता शेतकऱ्यांच्या अक्षरशा नाकी नऊ येते. त्यामुळे शेतकरी बांधव कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. म्हणूनच पीक पद्धतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे.

आता मागणी मध्ये असलेल्या नगदी पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. आज आपण अशाच मागणी मध्ये असलेल्या जिरे पिकाची लागवडविषयी जाणून घेणार आहोत. भारतातील प्रत्यक्ष स्वयंपाक घरात एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ म्हणून जिऱ्याची ओळख, त्यामुळे जिरे बाजारात सदैव मागणी मध्ये असते याला अधिक दर देखील मिळत असतो. मात्र असे असले तरी, जिरे लागवड करण्याआधी शेतकरी बांधवांनी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो. कृषी तज्ञांच्या मते, जिरे लागवड हलक्‍या जमिनीत तसेच चिकन माती असलेल्या जमिनीत करता येणे शक्य आहे.

अशा जमिनीत जिरे लागवड केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन मिळत असते. असे असले तरी जिरे पिकापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी जमिनीची चांगली पूर्वमशागत करणे आवश्यक असणार आहे, जिरे लागवड करण्यासाठी जमिनीची व्यवस्थित नांगरणी करून जमीन भुसभुशीत करणे आवश्यक आहे. पूर्वमशागत झाल्यानंतर क्षेत्रातील सर्व कचरा साफ करुन घ्यावा.

जिरे पिकाच्या काही प्रमुख जाती- जिरे पिकाचे RZ 19 आणि 209, RZ 223 आणि GC 1-2-3 हे वाण चांगले मानले जाते. या जातींची लागवड केल्यास 125 दिवसांत उत्पादन घेतले जाऊ शकते. या जातींपासून सरासरी उत्पादन 510 ते 530 किलो प्रति हेक्टर एवढे मिळत असल्याचा दावा केला जातो. 

त्यामुळे या जातीची लागवड चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात. देशातील 80 टक्क्यांहून अधिक जिरे गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्पादीत केले जाते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 28 टक्के जिऱ्याचे उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये घेतले जाते. जिऱ्याच्या लागवडीसाठी हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपये खर्च येतो. जिऱ्याची किंमत 100 रुपये प्रतिकिलो धरल्यास 5 एकर क्षेत्रात जिरे लागवड केल्यास 2 ते 2.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

English Summary: cumin seed farming is very good for income learn more about this farming
Published on: 06 March 2022, 05:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)