Agripedia

कोरोना कालावधीपासून बरेच शिक्षण घेतलेले लोक शेती व्यवसायाकडे वळत आहेत. जर तुम्हाला सुद्धा शेतीच्या माध्यमातून चांगलीकमाई करायची इच्छा असेल तरआपण या लेखामध्ये अशा एका प्रोडक्टची माहिती घेणार आहोत ज्याची वर्षभर चांगली मागणी असते.

Updated on 13 May, 2022 12:58 PM IST

 कोरोना कालावधीपासून बरेच शिक्षण घेतलेले लोक शेती व्यवसायाकडे वळत आहेत. जर तुम्हाला सुद्धा शेतीच्या माध्यमातून चांगलीकमाई करायची इच्छा असेल तरआपण या लेखामध्ये अशा एका प्रोडक्टची माहिती घेणार आहोत ज्याची वर्षभर चांगली मागणी असते.

ते म्हणजे जिऱ्याची शेती होय. आपल्याला माहित आहेच कि स्वयंपाक घरामध्ये जिऱ्याचा उपयोगमोठ्या प्रमाणात केला जातो.जिऱ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे औषधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे याची मागणी दुप्पट प्रमाणात वाढते. जिऱ्याच्या शेतीसाठी हलकी, काळी माती राहिली तर चांगलेच, कारण अशा प्रकारच्या मातीमध्ये जिऱ्याचे पीक चांगले येते.

 लागवडीआधी पूर्वतयारी

 जिऱ्याची लागवड करण्याअगोदरशेतीची व्यवस्थित तयारी करणे खूप गरजेचे असते.यासाठी शेताला चांगल्या पद्धतीने नांगरून आणि रोटावेटर किंवा कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतामध्ये जिरे लागवड करायचे आहे अशा शेतामध्ये  तणांचा प्रादुर्भाव असेल तर नींदून वगैरे साफ करणे गरजेचे आहे.

 जिर्याच्या चांगल्या जातीVeriety Of Cumin Crop)

 जिऱ्याच्या जातीमध्ये तीन व्हरायटी या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये आरझेड 19 आणि 209, आर झेड 223 आणि जीसी 1-2-3 या जाती खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या जाती 120 ते 125 दिवसांत काढणीला येतात. या जातीपासून सरासरी प्रति हेक्टर 510 ते 530 किलोग्रॅम  उत्पादन मिळते. त्यामुळे या जातींची लागवड करून चांगली कमाई होऊ शकते.

 जिरे लागवडीतून कमाई(Income Through Cumin Cultivation)

 भारतातील 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उत्पादन गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये होते. जर राजस्थान राज्याचा विचार केला तर भारतातील एकूण उत्पादनापैकी 28 टक्के उत्पादन येथे होते. जर जिऱ्याच्या उत्पादन आणि मिळणारे उत्पन्न याबद्दल विचार केला तर प्रति हेक्‍टरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळते. यासाठी प्रति हेक्‍टर 30 हजार ते 35 हजार रुपये खर्च येतो.  जर जिऱ्याचा भाव शंभर रुपये प्रति किलो पकडला तर 40 हजार ते 45 हजार रुपये प्रति हेक्‍टर निव्वळ नफा मिळू शकतो.

जर पाच एकर शेतीमध्ये जिरा लागवड केली तर दोन ते सव्वादोन लाख रुपयेउत्पन्न मिळणे सहज शक्य आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

नक्की वाचा:तळाची कमाल! 'या' पिकाची लागवड करून कमावले तब्बल १३ लाख रुपये, तुम्हीही करा प्रयत्न

नक्की वाचा:Business Idea 2022: नोकरीचा कंटाळा आलाय; व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात; मग सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ

नक्की वाचा:बातमी कामाची! बारामाही मागणी असलेल्या या विदेशी फळाची शेती करा आणि कमवा बक्कळ; वाचा सविस्तर

English Summary: cumin farming is so profitable and give more income to farmer
Published on: 13 May 2022, 12:58 IST