आता जानेवारी महिना जवळ जवळ संपत आले आहे.जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी महिनासुरू होईल. फेब्रुवारी महिना हा तुमच्या शेतात किंवा किचन गार्डन मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि पीक वाढवण्यासाठी सर्वात्तममहिना मानला जातो.
फेब्रुवारी मध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून चांगले आर्थिक फायदे मिळू शकतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासोबतच हवामान आणि बाजाराची वेळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करावी.जेणेकरून बाजारात मागणीनुसार चांगला भाव मिळू शकेल.
फेब्रुवारी महिन्यात करा या फायदेशीर भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड……
- दोडका लागवड- या भाजीपाले वर्ग या पिकाची लागवड भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते. शिवाय दोडक्या मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते अनेक प्रकारच्या आरोग्य फायदा साठी देखील ओळखले जाते. दोडक्याच्या शेतीला उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते त्यासोबतच पाण्याचा चांगला निचरा होणारी, जिवाणू असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते. दोडक्याची लागवड सुरू करण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिना असून त्याला बाजारात मोठी मागणी असते.
दोडक्याची सुधारित वाण
पुसा स्नेह,काशी दिव्या, स्वर्ण प्रभा, कल्याणपुर हरी चिकणी,राजेंद्र एक, पंत चिकन एक या जाती लागवडीसाठी फायदेशीर आहेत.
2-मिरची- मिरचीच्या सुधारित जाती मध्ये काशी अनमोल, काशी विश्वनाथ, जवाहर मिर्च-283, जवाहर मिर्च-218, अर्का सुपर आणि काशी अर्ली, काशी सुर्खकिंवा काशी हरिता या संकरित वाणांचा समावेश होतो. जेअधिक उत्पादन देतात.
- कारले-कारल्याला बाजारांमध्ये भरपूर मागणी असण्यासोबतच कारल्याचा अनेक रोगांवर फायदा होतो.कारले लागवडीच्या माध्यमातून शेतकरी भरपूर कमाई करू शकतात. कारल्याची शेती भारतातील अनेक प्रकारचे मातीत केली जाऊ शकते.पाण्याचा चांगला निचरा होणारी, मातीत जिवाणू असलेली जमिन कारल्याच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी योग्य मानली जाते.
कारल्याच्या जाति
शेतकऱ्यांमध्ये कारला पुसातेहंगामी,पुसा स्पेशल, कल्याणपुर, प्रिया सिओ-1,एस डी यु एक, कोईमतूर लांब, कल्याणपुर सोना, बारमाही कारला, पंजाब कडू एक,पंजाब 14, सोलर हारा, सोलन आणि बारमाही याचा समावेश आहे.
- दुधी भोपळा- दुधी भोपळा मध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि पाणी या शिवाय जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दुधी भोपळ्याची शेती डोंगराळ भागापासून ते मैदानी भागापर्यंत केली जाते. दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान आवश्यक आहे. स्टेट लागवडीसाठी बियाणे पेरणीपूर्वी 24 तास पाण्यात भिजवावे.जेणेकरून उगवन प्रक्रियेला गती देते. या प्रक्रियेनंतर बियाणे शेतात लागवडीसाठी तयार होते.
- भेंडी- भेंडी ही भारतातील सर्वात आवडते आणि आरोग्यदायी भाज्यापैकी एक आहे. याशिवाय ही अशी भाजी आहे देशाच्या जवळ जवळ प्रत्येक भागात घेतली जाऊ शकते.
- भेंडीच्या शेतीसाठी तीन मुख्य लागवड हंगाम फेब्रुवारी एप्रिल, जून जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर आहेत. भेंडीच्या अनेक चांगला जाती आहेत ज्या शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देतात.
भेंडीच्या उपयुक्त जाती
फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या भेंडीच्या लागवडीसाठी पुसा ए4, परभणी क्रांती, पंजाब 7,अर्का अभय,अर्का अनामिका, वर्षा उपहार इत्यादी जाती उपयुक्त आहेत(स्त्रोत- हॅलो कृषी)
Published on: 26 January 2022, 12:21 IST